Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी NRC वरुन सरकार गोंधळ निर्माण करतय - पवार

NRC वरुन सरकार गोंधळ निर्माण करतय – पवार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रामलीलावर बोलताना NRC बाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली नसल्याचे सांगितले. मात्र मंत्रिमंडळात चर्चा झाल्याशिवाय एवढी मोठी योजना आकार घेऊ शकत नाही. तसेच यावर्षी राष्ट्रपतींच्या अभिभाषणात NRC लागू करण्याचा उल्लेख आलेला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात NRC संबंध देशभर लागू करणार असे सांगितले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की NRC लागू होणार नाही. NRC वरुन सरकारी पातळीवरच गोंधळ असल्याचे दिसते, अशी टीका शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीमुळे होणारे ध्रुवीकरण जनतेने नाकारले आणि संपत्तीचा वापर करणाऱ्यांना झारखंडच्या जनतेने धडा शिकवला, असेही पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले की, पंतप्रधान हे संवैधानिक पद आहे. आम्ही त्या पदाचा आदर ठेवतो. मात्र एनआरसीबाबत सरकारमध्ये असलेला विसंवाद समोर आणणे गरजेचे होते, त्यामुळेच मोदींच्या कालच्या वक्तव्यावर भाष्य केले. सीएए आणि एनआरसी मधून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, जो झारखंडच्या लोकांना रुचला नाही.

तुमचं आंदोलन शांततेत करा – शरद पवार

- Advertisement -

पवार पुढे म्हणाले की, “देशभरात CAA आणि NRC वरुन जनआंदोलन उभे राहत आहे. अशावेळेला त्याच्याविरोधात काही लोक राजकीय आंदोलन करत आहे. या राजकीय आंदोलनामुळे जनआंदोलनाची तीव्रता अजून वाढत जाते आणि आम्हाला ते नकोय. तसेच नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात जे लोक आंदोलन करत आहेत, त्यांनी देखील गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करावे, असे माझे आवाहन आहे. सार्वजनिक मालमत्तेचे काही नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी”

 

- Advertisement -

 

- Advertisment -