कमी वजनाच्या बाळांच्या संख्येत, महाराष्ट्र अग्रेसर!

कमी वजनाच्या बाळांच्या संख्येत, महाराष्ट्र अग्रेसर!

रुग्णालयाच्या चुकीमुळे तीनदिवसाच्या बाळासह आईला कोरोना

महाराष्ट्रासह मुंबईत सध्या कमी वजनांच्या बाळांची संख्या वाढत चालली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, महाराष्ट्र राज्य सलग ३ वर्ष कमी वजनांच्या बाळांच्या संख्येमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईतही याचं प्रमाण अधिक आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, गर्भवती मातांचं होणारं कुपोषण हे यामागील मुख्य कारण आहे. याशिवाय शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कुपोषणाचं हे प्रमाण तिप्पट असल्याचं तज्ज्ञ सांगतात. दरम्यान २.५ किलोपेक्षा कमी वजन असलेल्या बाळांची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. महाराष्ट्रात १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या काळात- २ लाख ५ हजार ५८२ बाळं जन्मली आहेत. त्यापैकी १,५६,३७९ सार्वजनिक रुग्णालयात तर ४९,२०३ खासगी रुग्णालयात जन्मलेली आहेत. त्यापैकी कमी वजनाची बाळं शहरी भागात ४३ हजार ५५१ तर ग्रामीण भागात १ लाख ६२ हजार ३१ इतकी बाळं असल्याची नोंद झाली आहे. सार्वजनिक आणि खासगी हॉस्पिटलमधील हे प्रमाण ३:१ आहे. म्हणजेच कमी वजनाच्या प्रत्येकी ४ बाळांपैकी ३ बाळं सार्वजनिक रुग्णालयात तर एक बाळ खासगी रुग्णालयातील आहे.

३ वर्षांतील आकडेवारीनुसार…

२०१७ – २०१८ या काळात महाराष्ट्रामध्ये २ लाख ०५ हजार ५८२ कमी वजनाच्या बाळांचा जन्म झाला. तर, उत्तरप्रदेशात ही संख्या सर्वात जास्त आहे. यावर्षी तिथे ३ लाख ६१ हजार ८८६ कमी वजनाच्या बाळांचा जन्म झाला असून उत्तरप्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय, पश्चिम बंगालमध्ये २ लाख ४० हजार ३११ कमी वजनाच्या बाळांचा जन्म झाल असून हे शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान २०१६ – १७ सालात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होता. यावर्षी महाराष्ट्रात २ लाख १० हजार ७४८ कमी वजनाच्या बाळांचा जन्म झाला होता.


२०१५ – १६ या वर्षाची आकडेवारी

उत्तर प्रदेश – ३,३३,५७१
राजस्थान – ३,३२,८०२
महाराष्ट्र – २,२१,२५७
पश्चिम बंगाल – २,१०,०१०

राज्यातील कमी वजनाच्या एकूण बाळांपैकी शहरी भागात ४३ हजार ५५१ तर, ग्रामीण भागात १ लाख ६२ हजार ३१ इतकी कमी वजनाची बाळं आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात हे प्रमाण ४:१ आहे. म्हणजे कमी वजनाच्या प्रत्येकी ५ बाळांपैकी ४ बाळं ग्रामीण तर एक बाळ शहरी भागातलं आहे.

तर, मुंबईतही सर्वात जास्त कमी वजनांच्या बाळांची संख्या आहे. मुंबईतील कमी वजनांच्या बाळांचा आकडा २१ हजार १४७ आहे. मुंबईत जवळपास १० टक्के म्हणजे १० पैकी एक बाळ कमी वजनाचं आहे. एप्रिल २०१८ ते ऑगस्ट २०१८ महाराष्ट्रात ६४ हजार २५९ बाळं कमी वजनाची आहेत, त्यापैकी ६ हजार ६४ मुंबईत आहेत.

शहरातील संख्या

वर्ष – २०१५ – १६
मुंबई – २५ हजार ३४१
पुणे – १९ हजार ९२०
ठाणे – १६ हजाक ६६६

वर्ष – २०१६ – १७
मुंबई – २० हजार ७९३
पुणे – १८ हजार ८६८
ठाणे – १३ हजार ८६४

वर्ष – २०१७ – १८
मुंबई – २१ हजार १४७
पुणे – २० हजार १०२
ठाणे – १४ हजार २९२


कमी वजनाची बाळं जन्मण्याची कारणे

बाळाच्या कुपोषणाआधी गर्भवती महिलेचं होणारं कुपोषण हा सर्वात मोठा मुद्दा आहे. बाळांच्या कमी वजनासाठी ५० टक्के गर्भवती महिला आणि तिचे कुटुंबिय जबाबदार असतात. त्यामुळे गर्भारअवस्थेत मातेनं चांगला आणि सकस आहार घेणं सर्वात महत्त्वाचं असतं. शिवाय, मातेचं हिमोग्लोबिन हा ही एक मुद्दा आहे. त्यामुळे गर्भअवस्थेत सतत तपासण्या करुन घेणं गरजेचं असतं. त्यासोबतच तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजेच मातांमध्ये स्तनपानाचा असणार गैरसमज. या गैरसमजातून माता बाळाला स्तनपान करत नाहीत. त्यातूनही बाळाचं वजन कमी असतं.– डॉ. क्रांती रायमाने, स्त्रीरोगतज्ज्ञ 

जवळपास ८० टक्के गर्भवती महिला या अॅनेमिक असतात. त्यासोबतच मातांच्या कुपोषणाचं प्रमाण ही जास्त आहे. गर्भवती राहण्याआधी आणि नंतर सकस आहार घेणं गरजेचं असतं. शिवाय जर काही इन्फेक्शन असेल आणि प्रसूती कळा लवकर सुरू झाल्या तरी बाळाच्या वजनावर फरक पडतो. काही वेळेला नातेवाईक किंवा कुटुंबिय बाळाचं वजन खूप वाढेल म्हणून‌ महिलेला कमी खाण्याचा सल्ला देतात. त्यानंतर मग सिझेरीन करावं लागेल अशी भीतीही घालतात. शिवाय कॅल्शिअम आणि आयर्नचं प्रमाण तीन‌ महिन्यांनंतर घेतलं जातं. मात्र, मातांशी ही भीती बाळगू नये.– डॉ. कामाक्षी भाटे, प्रोफेसर, केईएम रुग्णालय

First Published on: September 11, 2018 9:12 PM
Exit mobile version