‘आमचा अभंग आणि तुमचं कीर्तन’, राऊतांचा फडणवीसांना टोला; तुम्ही करताय ते…’

‘आमचा अभंग आणि तुमचं कीर्तन’, राऊतांचा फडणवीसांना टोला; तुम्ही करताय ते…’

संग्रहित छायाचित्र

आमच्या अभंगात तुम्ही सामिल व्हा. आमचा अभंग तर तुमचं कीर्तन. पण, तुम्ही कीर्तन करताय का? तुम्ही जे करताय ते थोतांड आहे, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. काल एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर निशाणा साधला होता त्यानंतर आता उत्तर देताना राऊत यांनी फडणवीसांना आमचा अभंग तर तुमचं कीर्तन, थोतांड असं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी अनेक विषयांवरही भाष्य केलं. ( Thackeray group leader Sanjay Raut criticised Devendra Fadnavis )

फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर

राजकारणातील कटुता संपवायची असेल तर सकाळचा अभंग बंद करायला हवा, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी काल संजय राऊतांना लगावला होता. त्यालाही राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. आमच्या अभंगात फडणवीसांनी सहभागी व्हावं. त्यांनी अभंगाची चेष्टा करु नये. अभंग ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुमच्यात हिंमत असेल तर अभंगाला चेष्टा करु नये. अभंग ही महाराष्ट्राच्या संस्कृती आहे. तुमच्यात हिंमत असेल तर अभंगाला उत्तर द्या, असे ते म्हणाले.

( हेही वाचा: “नेत्यांना शाही मेजवानी, श्रीसदस्य उपाशी; लाईट अॅण्ड शेड्स कंपनीत भागीदार कोण शोधा”; राऊतांचा गंभीर आरोप )

तुम्ही कुठं कमी पडला?

आमच्या हातात सत्ता द्या, लगेच आरक्षण देतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मग आता त्यांच्या हातात नऊ महिन्यांपासून सत्ता आहे. अशावेळी सीमाप्रश्नापासून ते मराठा आरक्षणापर्यंत कोणताही निकाल मनासारखा लागत नाही. याचं काय कारण आहे? या विषयावर तुमची दातखिळी का बसली आहे? आमच्या हातातून धनुष्यबाण चिन्ह काढून घेताना तुमच्या हालचाली बरोबर असतात. मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही कुठे कमी पडलात? हे तुम्ही लोकांसमोर येऊन सांगायला हवं, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

First Published on: April 21, 2023 10:29 AM
Exit mobile version