घरमहाराष्ट्र"नेत्यांना शाही मेजवानी, श्रीसदस्य उपाशी; लाईट अॅण्ड शेड्स कंपनीत भागीदार कोण शोधा";...

“नेत्यांना शाही मेजवानी, श्रीसदस्य उपाशी; लाईट अॅण्ड शेड्स कंपनीत भागीदार कोण शोधा”; राऊतांचा गंभीर आरोप

Subscribe

संजय राऊत म्हणाले की, नेत्यांना या खारघरच्या कार्यक्रमात नेत्यांना शाही मेजवानी होती, परंतु श्रीसदस्य मात्र उपाशी होते. लाईट अ‌ॅण्ड शेड्स कंपनीत भागीदार कोण आहे, हे शोधा याची सखोल चौकशी करा, असं राऊत म्हणाले.

ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डाॅक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी घेतलेल्या कार्यक्रमात उष्माघाताने 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला तर अजूनही काही जण उपचाराधीन आहेत. या दुर्घटनेनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे. आता यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यासंदर्भात सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.( Sanjay Raut Kharghar event Shree Sadasya death light and shades company partner find out )

संजय राऊत म्हणाले की, नेत्यांना या खारघरच्या कार्यक्रमात नेत्यांना शाही मेजवानी होती, परंतु श्रीसदस्य मात्र उपाशी होते. लाईट अ‌ॅण्ड शेड्स कंपनीत भागीदार कोण आहे, हे शोधा याची सखोल चौकशी करा, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

नेत्यांना शाही मेजवानी, श्रीसदस्य उपाशी

नेत्यांना शाही मेजवानी तर बाहेरचे लोक उपाशी मेले. या शाही मेजवानाची चौकशी करणार आहेत का? महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना विधानसभेत बोलण्याची संधी मिळाली पाहिजे प्रत्येकाकडे वेगळी माहिती आहे. खारघरच्या हत्याकांडावर एक- दोन दिवसाचं अधिवेशन घ्या, तुम्ही साधू कांड पालघर झालं त्यावेळी स्पेशल अधिवेशाची मागणी केली होती. खारघरमधील हत्याकांडावर सरकार बोलायला तयार नाही. मुख्यमंत्री तोंड उघडत नाहीत, मुख्यमंत्री बोलत नाहीत उपुख्यमंत्रीदेखील यावर भाष्य करत नाहीत, असे राऊत यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील गर्दीचे ड्रोनद्वारे चित्रिकरण करण्यासाठी मंडप टाकण्यात आला नव्हता, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. आम्ही किती गर्दी जमवू शकतो हे सरकारला दाखवायचं होतं म्हणून मंडप टाकला नाही, असं देखील राऊत म्हणाले.

- Advertisement -

( हेही वाचा: ‘आमचा अभंग आणि तुमचं किर्तन’, राऊतांचा फडणवीसांना टोला; तुम्ही करताय ते…’ )

काय मागण्या करता?

काय मागण्या करता? कोणासाठी करता? खारघरला लोकं तडफडून मेले. बाजूला मेजवान्या सुरु होत्या. पण लोकांना प्यायला पाणी नव्हते. त्यावर बोला. ढिसाळ नियोजनावर बोला. कशाकरता सर्व कार्यक्रम केला त्यावर बोला. उठसूट उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे… सुरु आहे. झोपेतही उद्धव ठाकरे आणि जागेपणी उद्धव ठाकरेचं सुरु आहे, असे चिमटेही त्यांनी काढले.

भाजपने पाळलेले पोपट

भाजपने एवढे पोपट पाळून ठेवले आहेत. त्यांनी बोलू द्या. पोपटपंची करु द्या. या पोपटांना इतर मुद्यांवरुनही बोलू द्या. हे नोटबंदीच्या रांगेत हजारो लोक मेले यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा यावर का बोलत नाहीत भाजपचे पोपट, असं म्हणत राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -