मेक इन इंडिया! मुंबईला मिळाले दुसरे रडार

मेक इन इंडिया! मुंबईला मिळाले दुसरे रडार

dopler radar

मुंबई: मेक इन इंडियाच्या उपक्रमांतर्गत वेधशाळेच्या स्थापना दिनीच म्हणजेच 14 जानेवारीला मुंबईला दुसरे C-band Doppler रडार मिळालेय. भारतीय बनावटीचे हे पहिले रडार असल्याचे सांगितले जात आहे. या रडारमुळे मुंबईच्या 450 किलोमीटर परिघातील वातावरण बदल आणि प्रत्येक तीन तासांमधील मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटाबाबत या रडारच्या उपयोगातून माहिती मिळणार आहे.

मुंबईतील गोरेगावमधील वेरावली येथे सी बॅण्डच्या रडारचे शुक्रवारी 14 जानेवारीला पृथ्वी आणि विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या रडारबाबत सांगताना रडारची निर्मिती इस्त्रेक आणि इस्रोमधील (ISRO) रडार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली झाली असून, याचा वापर पावसाच्या अचूक अंदाजासाठी करण्यात येणार आहे.

भारतात मुंबईसह दिल्ली, लेह आणि चेन्नई अशा चार ठिकाणी एकाच दिवशी चार रडार कार्यान्वित होणार आहेत. यापूर्वी मुंबईत कुलाबा वेधशाळेनजीक एस बॅण्डचे रडार कार्यान्वित असून, यावरून वादळ तसेच पावसाच्या अंदाज वर्तवला जातो. मुंबईतील 26 जुलैच्या जलप्रलयानंतर मुंबईतील हवामानाच्या अंदाजासासाठी अजून एका रडारची गरज भासू लागली होती. त्याप्रमाणे केंद्राने आणि राज्याने प्रयत्न सुरू ठेवलेत. रडारसाठी जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केलेत.

कोणती उपकरणे वापरली जातात?

हाय-स्पीड कॉम्प्युटर, हवामानशास्त्रीय उपग्रह आणि हवामान रडार हवामान अंदाजात महत्त्वाची भूमिका बजावतात. याद्वारे अचूक डेटा मिळण्यास मदत होत असून, हळूहळू या तंत्रज्ञानात सुधारणा होत आहे. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरत आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास हवामानाचा अंदाज घेण्यासाठी हवामान डेटाशी संबंधित माहिती प्रथम प्राप्त केली जाते. यासोबतच वाऱ्यांच्या दिशेवरून तापमान, दाब, आर्द्रता इत्यादी गोष्टी कळतात. यासोबतच यामध्ये डॉप्लर रडारचा डेटाही वापरला जातो आणि त्यानंतर डेटा अॅनालिसिस करून हवामानाचा अंदाज घेतला जातो.


हेही वाचा: History Of The Day: मराठ्यांच्या शौर्याचा जाज्वल्य अभिमान; आजच्याच दिवशी घडला पानिपतचा इतिहास, जाणून घ्या

First Published on: January 14, 2022 1:20 PM
Exit mobile version