नाशिकमध्ये सुरु होणार ‘मूकबधिरां’साठी उच्च माध्यमिक विद्यालये

नाशिकमध्ये सुरु होणार ‘मूकबधिरां’साठी उच्च माध्यमिक विद्यालये

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले

राज्यातील कर्णबधीर आणि मूकबधिर विद्यार्थ्यांच्या मागण्यांसदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काही प्रमुख मागण्यांची पूर्तता केली आहे. मूकबधिरांच्या उच्च शिक्षणाकरिता उच्च माध्यमिक विद्यालय सुरु करण्याची मागणी होती. सध्या पाच विभागात ही विद्यालये सुरु असून लातूर आणि नाशिक विभागात उच्च माध्यमिक विद्यालय सुरु करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत, अशी घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी विधान सभेत केल्याचे समोर आले आहे.

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा

पुणे येथे मूकबधिर मुलांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या विरोधात मंगळवारी विधान सभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला होता. त्यावेळी सभागृहात निवेदन देताना त्यांनी लातूर आणि नाशिक विभागात उच्च माध्यमिक विद्यालय सुरु करण्याबाबत निर्देश देण्यात आले. यावेळी राजकुमार बडोले पुढे म्हणाले की, विद्यालय सुरु करण्याबाबत सक्षम संस्थेला मान्यता देताना कर्णबधीर आणि मूकबधिर संघटनेच्या प्रतिनिधींचे मत विचारात घेतले जाईल. तसेच पदांच्या निश्चितीसाठी असलेल्या तज्ज्ञ समितीमध्ये या संघटनेच्या दोन प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य शासकीय विद्यालयांमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

तर दिव्यांगाकरिता शासकीय नोकरीसाठी आरक्ष‍ित पदांवर अंध, मूकबधिर, अस्थिव्यंग उमेदवार उपलब्ध झाल्यास आणि तो पात्र ठरल्यास त्यामधून अंध, मूकबधिर प्रवर्गातील उमेदवारास नियुक्ती देताना प्राधान्य दिले जाईल. मूकबधिर व्यक्तीस सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांने पात्र ठरविल्यानंतर त्याला वाहनचालक परवाना देण्यात येईल. तसेच मूकबधिर प्रवर्गातून नियुक्ती झालेल्यांची तपासणी करण्याबाबत सामान्य प्रशासन आणि आरोग्य विभागामार्फत आठ दिवसात परिपत्रक काढले जाईल. त्याचबरोबर अन्य मागण्यासंर्भात हे अधिवेशन संपण्यापूर्वी मुख्यमंत्र्यासमवेत बैठक घेतली जाईल, असेही बडोले यांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा – दिव्यांगांसाठी विशेष क्रिडा संकूल उभारणार – राजकुमार बडोले

हेही वाचा – लोकसहभागातून शाळा बनली डिजिटल


 

First Published on: February 26, 2019 7:59 PM
Exit mobile version