घरमहाराष्ट्रपुणे लाठी हल्ल्याप्रकरणी 'न्यायालयीन चौकशी' हवी

पुणे लाठी हल्ल्याप्रकरणी ‘न्यायालयीन चौकशी’ हवी

Subscribe

पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालयासमोर कर्णबधिर तरुणांनी आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान कर्णबधिर तरुणांवर लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीहल्ल्याप्रकरणी 'न्यायालयीन चौकशी' व्हावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार निलम गोऱ्हे यांनी केले आहे.

पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱ्या मूकबधिरांच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्याचे पडसाद मंगळवारी विधान परिषदेत देखील उमटले आहेत. याप्रश्नी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत माफीनामा मागावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. तर याप्रश्नी फक्त निलंबनाची कारवाई न करिता न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी केली आहे. तर समाज कल्याण आयुक्तालयाचे माजी आयुक्त बालाजी मंजुळे यांची केलेली बदली रद्द करावी, असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

लाठी हल्ल्यामुळे राजकीय वातावरण तापले

पुण्यातील समाज कल्याण आयुक्त कार्यालयासमोर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील मूकबधिर मुलांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा धारण केला आहे. त्यावेळी पोलिसांनी या मुलांवर अमानुषपणे लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्यामुळे राजकीय वातावरण ही तापू लागले असून सर्व स्तरातून याचा निषेध व्यक्त केला जात आहे. त्याचेच पडसाद मंगळवारी विधान परिषदेत देखील दिसून आले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी स्थगन प्रस्तावाची मागणी करुन सरकारविरोधात हल्लाबोल चढविला आहे. एकीकडे करोडो बेरोजगारांना रोजगार दिल्याची जाहिरातबाजी करायची आणि दुसरीकडे मूकबधिरांवर लाठीहल्ला करायचा याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

- Advertisement -

दिव्यांग तरुणाचे प्रश्न समजून घ्या

यावेळी इतर पक्षाच्या आमदारांनी देखील याविरोधात तीव्र भावना मांडल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अख्तारित गृहखाते येते. त्यामुळे त्यांनी या प्रश्नी सभागृहात माफीनामा सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली. तर हेमंत टकले यांनी देखील यावेळी बोलताना सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. या मुलांना फक्त दिव्यांग बोलून होत नाही. त्यांचे प्रश्न समजून घ्यायला हवे. पोलिसांनी त्यांचे प्रश्न समजून न घेताच त्यांच्यावर लाठीहल्ला केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, यावेळी सरकारची बाजू मांडताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘जो काही प्रकार घडला त्याबद्दल मी सरकारच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोषींवर नक्की कारवाई करण्यात येईल. तर सरकारच्यावतीने या विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी शिष्टमंडळ पाठविले आहे किंवा या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ याठिकाणी आणता येईल का, यासाठीही प्रयत्न सुरु असल्याचे’ त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – कर्णबधिर तरुणांची साद अखेर राजकीय नेत्यांनी ‘ऐकली’!

- Advertisement -

हेही वाचा – कर्णबधिर आंदोलकांवरील लाठीचार्जची चौकशी होणार – दिलीप कांबळे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -