चार्जिंग करताना इलेक्ट्रीक बाईकच्या बॅटरीचा स्फोट

चार्जिंग करताना इलेक्ट्रीक बाईकच्या बॅटरीचा स्फोट

इलेक्ट्रीक बाईकची बॅटरी चार्जिंग करताना स्फोट झाल्याची घटना सोमवारी (दि.१२) सकाळी इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी येथे घडली. या दुर्घटनेत बॅटरीसह दुचाकी जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी दुचाकी, इलेक्ट्रीक बोर्डसह इमारतीचे नुकसान झाले आहे.

इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पांडवनगरी परिसरातील ऐश्वर्या रेसिडेन्सीच्या पार्किंगमध्ये रहिवासी सुरजित सिंग यांनी सोमवारी (दि.१२) सकाळी सात वाजेदरम्यान इलेक्ट्रीक बाईक चार्जिंगसाठी वीज मीटर पेटीच्याजवळ मुख्य स्वीचमध्ये जोडणी करुन लावली होती. सकाळी साडेनऊ वाजेच्य सुमारास प्रमाणपेक्षा जास्त बॅटरी चार्ज झाल्याने तिचा स्फोट झाला. या घटनेत दुचाकी जळून खाक झाली. तर सोसायटीच्या वीज मीटरची पेटी जळाली. त्यामुळे सोसायटीचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. घटनेची माहिती पोलिसांसह अग्निशमन दलाला मिळताच सिडको उपकेंद्राचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

First Published on: July 12, 2021 5:44 PM
Exit mobile version