भावाचा अपमान केला म्हणून भोकसून खून

भावाचा अपमान केला म्हणून भोकसून खून

The seventh murder within 15 days; Challenge to the police

नाशिक : घटना त्र्यंबकरोडवरील उत्कर्षनगर भागात भावाचा सर्वांसमोर अपमान केल्याच्या रागातून एका तरूणाने चाकूने भोसकून खून केल्याची घडली घडली आहे. रमेश नारायण ताठे (रा.उत्कर्षनगर) असे चाकू हल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मनिष रूपवते यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी संशयितांस ताब्यात घेण्यात आले आहे.

उत्कर्षनगर मित्र मंडळाच्या वतीने डॉ.आंबेडकर जयंती निमित्त चौकात स्टेज उभारणीचे काम सुरू असतांना बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. या ठिकाणीच हा वाद झाला त्यानंतर थेट खून करण्यापर्यंत हे प्रकरण गेले. याबाबत समजलेली माहिती अशी की, अजिंक्य जाधव हा तरूण मुलींना मोबाईल दाखवित होता. यावेळी मृत ताठे यांनी त्यास गाठून तू मुलींना मोबाईल का दाखवतो, येथून निघून जा असे म्हटल्याने ही घटना घडली.

रात्री घडलेल्या या घटनेवर पडदा पडलेला असतांना भावाचा अपमान केल्याच्या रागातून मध्यरात्री अजिंक्यचा भाऊ गौरव सुहास जाधव याने रमेश ताठे यांना गाठून उपस्थितांसमोर चाकू हल्ला केला. या हल्यात छाती आणि हातावर एकापाठोपाठ एक असे सपासप वार करण्यात आल्याने अतिरक्तश्राव होवून ताठे यांचा जागीच मृत्यू झाला.

First Published on: April 15, 2022 1:35 PM
Exit mobile version