Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious ज्ञानोबा- माऊली तुकारामाच्या गजरात तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

ज्ञानोबा- माऊली तुकारामाच्या गजरात तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Subscribe

राज्यात कोरोना संकटामुळे वारीवर निर्बंध घालण्यात आली होती. परंतु संकट टळल्यामुळे आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर शिंदे फडणवीस सरकारच्या काळातील पहिलीच वारी आहे. यामुळे मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात पालखी सोहळ्याला भाजप नेत्यांनी उपस्थिती लावली होती.

ज्ञानोबा- माऊली तुकारामाच्या गजरात जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झालं आहे. तुकोबांचा ३३८ वा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. पालखी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात भाविक देहूमध्ये दाखल झाले होते. तुकोबांचा जयघोष आणि मृदुंगांच्या गजरात तल्लीन होऊन भाविक पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. यावेळी पालकमंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित होते.

संत तुकोबा यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले असून आजचा मुक्काम हा इनामदार वाड्यात असणार आहे. उद्या पुन्हा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे. देहू सोडल्यावर लगेच अनगडशहा बाबा इथे पालखीची आरती होईल आणि पिंपरी-चिंचवड शहरामधील आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरात मुक्काम असेल. पालखी सोहळ्यासाठी भाविक देहूमध्ये शनिवारपासूनच मुक्कामी होते. वारकऱ्यांनी सकाळी इंद्रायनीकाठी स्नान केल्यानंतर तुकोबांचे दर्शन घेतलं. सोहळ्याची सुरुवात विधिवत पुजेने पहाटेपासूनच झाली होती.

- Advertisement -

राज्यात कोरोना संकटामुळे वारीवर निर्बंध घालण्यात आली होती. परंतु संकट टळल्यामुळे आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर शिंदे फडणवीस सरकारच्या काळातील पहिलीच वारी आहे. यामुळे मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात पालखी सोहळ्याला भाजप नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी उपस्थिती लावली होती.

पंढरपूरमध्ये सरकारकडून उपाययोजना

विेठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या जयघोषात पंढरीच्या वारीला सुरूवात झाली आहे. वारीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरात येत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य सरकारकडून काळजी घेण्यात येत आहेत. ४८८ आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक पथकात एक महिला आरोग्य कर्मचारी असणार आहे. तर आरोग्य केंद्रात हिरकणी कक्ष असेल. महिला निवारा कक्षात महिला नोडल अधिकारी असेल. महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाची गस्त तैनात असेल. महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था, महिला समन्वयक सोबत असणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा : Chanakya Niti : मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी पालकांनी ‘हे’ नियम पाळावे


 

- Advertisment -

Manini