राज्यात लवकरच फ्लोअर टेस्टची शक्यता, सत्ता स्थापनेसाठी भाजपची शिंदे गटासोबत तयारी सुरू

राज्यात लवकरच फ्लोअर टेस्टची शक्यता, सत्ता स्थापनेसाठी भाजपची शिंदे गटासोबत तयारी सुरू

विधानसभेच्या उपाध्यक्षांच्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांना 12 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला लवकरच सभागृहात आपले बहुमत सिद्ध करावे लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सूत्रांनुसार, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राज्यात सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेची स्वत:हून दखल घेऊन फ्लोअर टेस्टचे आदेश देऊ शकतात. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय जनता पक्ष उत्साही असून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटासह सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली असल्याचंही म्हटलं जातंय. (Possibility of floor test in the state soon, BJP begins preparations with Shinde group for formation of government)

हेही वाचा – उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून दोनदा पवारांनी रोखले

१२ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे, त्यामुळे ११ जुलैपूर्वी फ्लोअर टेस्टी मागणी केली जाऊ शकते असं म्हटलं जातंय. काही तांत्रिक मुद्द्यांवर शिंदे गट वरिष्ठ वकिलांचा सल्ला घेत असून याप्रकरणी लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे गट किंवा भाजप यांच्याकडून फ्लोअर टेस्टची मागणी होऊ शकते. यासाठी फ्लोअर टेस्टसाठी राज्यपाल विधानसभेचे अधिवेशनही बोलावू शकतात असं म्हटलं जातंय.

शिंदे गट दुसऱ्या पक्षासोबत जाणार का?

शिंदे गट मनसेत विलीन होणार असल्याची चर्चा कालपासून आहे. मात्र, शिंदे गटाकडे बहुमत असल्याने ते शिवसेनाच आहेत, असं भाजपच्या सूत्रांनी म्हटलं आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी त्यांना कोणा दुसऱ्या पक्षात जाण्याची गरज नाही.

हेही वाचा – ‘शिवसेने’कडून प्रस्ताव आल्यावरच विचार करू, कोअर कमिटी बैठकीनंतर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

कायद्याच्या विरोधात जाऊन विधानसभेचे उपाध्यक्ष काहीही करू शकणार नाहीत. जर उपाध्यक्षांनी नियमबाह्य काही केले तर राज्यपाल प्रोटेम स्पिकरची नियुक्ती करू शकतात.

गेल्या आठवड्यात दोन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचे अंतर्मन जागृत होऊन मुख्यमंत्रिपदाचा मोह ठाकरे घराण्याला नाही हे वारंवार सांगत होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोनदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यापासून रोखून धरलं. मविआ सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाले असून येत्या काही दिवसात ठाकरे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे.

First Published on: June 28, 2022 8:18 AM
Exit mobile version