घरट्रेंडिंगआमच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरेच : दीपक केसरकर

आमच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरेच : दीपक केसरकर

Subscribe

'महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडावे. आमच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरेच आहेत', असे शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी म्हटले. त

‘महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाहेर पडावे. आमच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) आहेत’, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले. तसेच, ‘कोणीही मातोश्रीवर आरोप करु नयेत’, असेही त्यांनी म्हटले. (uddhav thackeray is are party leader says deepak kesarkar)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिपक केसरकर म्हणाले की, “आम्हाला उद्धव ठाकरेंबाबत नितांत आदर आहे. आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम आणि आदर आहे. जनमताच्या कौलाप्रमाणे राज्य युती सरकार हवे होते, पण तसे झाले नाही. उद्धव ठाकरेंचे राष्ट्रवादीतील काहीजण सल्लागार आहेत. ठाकरेंना राष्ट्रवादीतील (NCP) सल्लागार महत्वाचे वाटतात. आधी मार्ग काढला असता, तर महाविकास आघाडी सरकार टिकले असते”, असे सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने उपसभापती, केंद्राला बजावली नोटीस बजावली

याशिवाय “सध्या काही आमदार वगळता सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहोत. असे करताना आमच्यावर गद्दाराचेही आरोप करण्यात आले आहेत. हे कितपत योग्य आहे?, बाहेर पडणाऱ्यांची समजूत काढण्याची पध्दत आहे. मात्र, इथं समजूत काढण्याची धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळं ठाकरेंनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडावी”, असेही त्यांनी सागितले.

- Advertisement -

दरम्यान, दीपक केसरकर यांनी आज पत्राद्वारे या नव्या गटाची भूमिका मांडली. या पत्रात “हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी हे मोठ पाऊल उचललं आहे. बंड नव्हे, शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा हा लढा आहे”, असे लिहिण्यात आले आहे.

या पत्राच्या माध्यमातून त्यांनी थेट संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. “आम्ही संपणार नाही, आम्ही थांबणार नाही, महाराष्ट्राला पुन्हा नव्या उंचीवर नेल्याशिवाय आता आम्ही माघार घेणार नाही!”, असा निर्धारही त्यांनी या पत्राद्वारे व्यक्त केला आहे.


हेही वाचा – ‘शिवसेने’कडून प्रस्ताव आल्यावरच विचार करू, कोअर कमिटी बैठकीनंतर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -