प्रकाश आंबेडकर भाजपासोबतही राजकीय समझौता करायला तयार, पण घातली ‘ही’ अट

प्रकाश आंबेडकर भाजपासोबतही राजकीय समझौता करायला तयार, पण घातली ‘ही’ अट

प्रकाश आंबेडकर भाजपासोबतही राजकीय समझौता करायला तयार, पण घातली 'ही' अट

Prakash Ambedkar on VBA – BJP alliance |लातूर – वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती होऊन आठवडाही उलटत नाहीत तोवर प्रकाश आंबेडकर यांनी भाजपासोबतही युती करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी भाजपाला एक अट घातली आहे. ती अट भाजपाने मान्य केल्यास भाजपासोबत राजकीय समझौता करायला तयार आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी आज स्पष्ट केलं. त्यांनी आज लातूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कोणताही राजकीय पक्ष एकमेकांचा दुष्मन नाही. भारतीयांमध्ये दुष्मनी असू शकत नाही. एकमेकांसोबत टोकाचे मतभेद असू शकतात. भाजपा-आरएसएससोबत आमचे टोकाचे मतभेद आहेत. हे मतभेद कशावरून आहेत ते मांडलेले सुद्धा आहे. आरएसएस आजही मनस्मृती मानते. आमचा लढा मनस्मृतीविरोधात आहे. मनस्मृती सोडून घटनेच्या चौकटीत भाजपा कार्य करायला तयार असेल तर आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांनी शब्द जपून वापरावेत – संजय राऊत

मनस्मृती धर्मग्रंथ नाही, सामाजिक-राजकीय व्यवस्था कशी असावी हे सांगणारा तो ग्रंथ आहे. त्यामध्ये आरएसएस बदल करणार असेल जो बदल सरदार पटेल जुलै १९४९ मध्ये केला होता. तो बदल भाजपा आणि आरएसएसला मनाने स्वीकारावा लागेल. संविधानाच्या चौकटीत राहून ते कामकाज करणार असतील तर आमच्यात राजकीय समजौता होऊ शकतो, असंही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

मविआत सहभागी होणार?

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. पण उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला याबाबत समजावत आहेत. वंचितला मविआबरोबर घेण्यासाठी ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येईल अशी आशा करू, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी मविआतील नेत्यांबाबत काहीही बोलू नये, असा सज्जड दम संजय राऊतांनी काल दिला होता. आजही पत्रकार परिषद घेत त्यांनी आंबेडकरांना इशारा दिलाय. यावर प्रकाश आंबेडकरांना विचारले असता ते म्हणाले, ‘हा सल्ला मला उद्धव ठाकरेंनी दिला तर मी मानेन.’

First Published on: January 27, 2023 12:30 PM
Exit mobile version