रावेरमधून काँग्रेसच्या पाटील यांना उमेदवारी; गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रावेरमधून काँग्रेसच्या पाटील यांना उमेदवारी; गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रावेरमधून काँग्रेसच्या उल्हास पाटील यांना उमेदवारी; प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लोकसभेच्या पुणे जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. राज्यभरातील शेकडो कार्यकर्त्यासह टिळक भवनमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तर लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपामध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्यानंतर उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान चर्चेच्या फेऱ्यांमध्ये अडकलेल्या सांगली जागेचा तिढा सुटला असून ती जागा आघाडीचा घटकपत्र असलेल्या स्वाभिनी शेतकरी संघटनेला सोडण्यात आली आहे. यावेळी बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादीकडून काँग्रेसला रावेरची जागा सोडण्यात आली होती. त्याठिकाणी पक्षाचा उमेदवार म्हणून उल्हास पाटील यांची घोषणा केली आहे. मात्र पुण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून तो सायंकाळपर्यंत जाहीर होईल, असे सांगत त्यांनी या जागेबाबत सस्पेन कायम ठेवला आहे.  – अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचा घोळ सुरु आहे. या जागेसाठी काँग्रेस पक्षातून देखील इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तसेच शुक्रवारी दिल्ली आणि पुण्यात घडलेल्या वेगवान घडामोडीनंतर गायकवाड यांचे मागे पडलेले नाव पुन्हा पुढे आले आहे. तर लोककलावंत सुरेखा पुणेकरांचे नाव देखील चर्चेत आले होते. मात्र, दिल्ली आणि पुण्यात झडलेल्या वेगवान घडामोडीनंतर गायकवाड यांचे मागे पडलेले नाव पुन्हा एकदा पुढे आले आहे.


वाचा – काँग्रेसच्या प्रचारासाठी मनसे मैदानात उतरली

वाचा – मनसेच्या शालिनीताईंनी दिल्या काँग्रेसच्या उर्मिलाला शुभेच्छा!


 

First Published on: March 30, 2019 4:21 PM
Exit mobile version