घरमुंबईमनसेच्या शालिनीताईंनी दिल्या काँग्रेसच्या उर्मिलाला शुभेच्छा!

मनसेच्या शालिनीताईंनी दिल्या काँग्रेसच्या उर्मिलाला शुभेच्छा!

Subscribe

आगामी लोकसभा निवडूणीकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या राजकीय क्षेत्रातील एन्ट्री बद्दल शुभेच्छा दिल्या आहेत

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. अखेर अधिकृतरित्या उर्मिलाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची अधिकृत घोषणा झाली. मुंबई उत्तर मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. काँग्रेसने या मतदार संघातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून या मतदारसंघात गोपाळ शेट्टींना पुन्हा उमेदवारी दिल्याने उर्मिला मातोंडकर गोपाळ शेट्टींना टक्कर देणास तयार आहे. २००४ प्रमाणे काँग्रेस या मतदारसंघात पुन्हा आपला झेंडा रोवणार की नाही हे पहावे लागणार आहे.

राजकारणातील एन्ट्री बद्दल शुभेच्छा

याच आगामी लोकसभा निवडूणीकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या राजकीय क्षेत्रातील एन्ट्री बद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आपल्या फेसबुकच्या वैयक्तिक अकांऊटवरून या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

संवेदनशील व्यक्तिमत्व राजकारणात आल्याचा आनंद

या फेसबुकवरील शुभेच्छा देणाऱ्या पोस्टमध्ये असे लिहीले आहे की, ”स्वतः तील अंगभूत अभिनयगुणांच्या जोरावर एक अभिनेत्री म्हणून तू स्वतःचा स्वतंत्र ठसा बॉलिवूडवर उमटवलास. अनेक उत्तमोत्तम सिनेमे तुझ्या वाट्याला आले आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचं तू सोनं केलंस. आज काँग्रेसने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून तुझं नाव जाहीर केलंय. राजकारणात सक्रिय होण्याचा हा निर्णय तू निश्चितच संपूर्ण विचारांती घेतला असशील. या निवडणुकीच्या निमित्ताने तुझ्यासारखं एक संवेदनशील व्यक्तिमत्व राजकारणात आल्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना-समस्यांना आवाज फोडण्यासाठी तुझ्यामुळे मदत होईल, याची खात्री आहे.”

- Advertisement -

तसेच, या नव्या राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रवेशाबद्दल नव्या इनिंगला ‘मनसे’ शुभेच्छा! देखील शालिनी ठाकरे यांनी दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -