‘राजकारणात टिकणार की नाही हे जनतेच्या हातात’

‘राजकारणात टिकणार की नाही हे जनतेच्या हातात’

युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेरमध्ये मेधा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात आज युवा आमदारांशी संवाद साधण्यात आला. यामध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार आदिती तटकरे, आमदार रोहित पवार, आमदार धीरज देशमुख, आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार झिशान सिद्दीकी या राजकारणातील तरुण पिढीची मुलाखत गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते याने घेतली. त्यावेळी धीरज देशमुख यांनी चित्रपटसृष्टीत आणि राजकारणातील साम्य काय असतं ते सांगितलं. त्यावेळी ते म्हणाले की, ‘कला क्षेत्रात आणि राजकारणात लोक ठरवतात तुमचं वैयक्तिक आयुष्य काय आहे? तुम्ही जरी ठरवलं असेल की, तुम्हाला राजकारणात यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पक्षाकडून तिकटं मिळले. मग तुम्ही निवडणूक लढाल पण राजकारणात टिकणार की नाही हे लोकांच्या हातात असतं. तसंच याशिवाय चित्रपट हिट होईल का नाही हे देखील लोकं ठरवतात.’

तसंच ते पुढे म्हणाले की, ‘मला लहानपणापासून एक खंत असायची. बाबा मला वेळ देऊ शकत नव्हते. पण त्यांचे कुटुंब किती मोठे होते हे मला आता समजले. तसंच साहेबांच्या नजरेतला मराठावाडा दुष्काळमुक्त आहे. महाविकास आघाडी याचं दिशेने चालतेय. मराठावाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व नेते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र विकासाचा पॅटर्न या देशामध्ये चालणार आहे.’

बाळासाहेब थोरात आणि विलासराव देशमुख यांच्या संबंधाबद्दल देखील धीरज देशमुख बोलले. यादरम्यान त्यांनी सांगितलं, ‘महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर माझे वडील विलासराव देशमुख यांचा खूप विश्वास होता. कोणते खाते द्यायचे हे विलासराव यांनी फोन करून बाळासाहेब थोरात यांना विचारले होते.’


हेही वाचा – वडिलांनी राजकारणापासून लांब ठेवलं पण…


 

First Published on: January 17, 2020 1:47 PM
Exit mobile version