घरमहाराष्ट्रवडिलांनी राजकारणापासून लांब ठेवलं पण...

वडिलांनी राजकारणापासून लांब ठेवलं पण…

Subscribe

वडिलांनी मला राजकारणापासून जेवढं दूर ठेवता येईल, तेवढा प्रयत्न केला होता. मात्र संघटनेत कामाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी राजकारणात येण्यास मदत केली असं वक्तव्य आमदार आदिती तटकरे यांनी केले. त्या
युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून अमृतवाहिनीत होत असलेल्या मेधा सांस्कृतिक महोत्सवात संवाद तरुणाईशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाअंतर्गत राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, आ. रोहित पवार, आ. धिरज देशमुख, आ. ऋतुराज पाटील, आ. झिशान सिद्दकी या तरुण आमदारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

मी शाळेत असताना आऊट स्टॅडिंग स्टूडंट होते. आऊट स्टॅडिंग म्हणजे मी जास्तीत जास्त वर्गाच्या बाहेर असायचे. मी शाळेत असताना क्रिडा क्षेत्राची आवड होती. पण एकीकडे लहानपणापासूनच वडिलांमुळे राजकारणात वावरत होते. कारण घरातही तसच वातावरण होतं. विलासराव देशमुख साहेबांना फार जवळून बघण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर शरद पवारांबरोबर काम करण्याची, वावरण्याची संधी मला मिळाली. शरद पवार साहेबांकडे एक कला आहे. ते कोणत्याही जनरेशनबरोबर बोलू शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारणाची आवड निर्माण झाली. असे आदिती तटकरे म्हणाल्या.

- Advertisement -

माझ्या वडिलांची इच्छा होती की मी राजकारणात येऊ नये. तीने जास्तीत जास्त राजकारणापासून लांब रहावं. पण जसजशी संघटनेच्या कामाला सुरूवात झाली तसं वडिलांना वाटलं की माझी मुलगी डॉक्टर किंवा इंजिनीयर होऊ शकत नाही आणि मी राजकारणात आले. महिलांना आमदार कमी, किंवा महिलांना राजकारणापासून वेगळं ठेवलं जातं का? या प्रश्नावर उत्तर देताना अदिती तटकरे म्हणाल्या, मला अजिबात वाटत नाही की राजकारणात महिलांना कमी महत्त्व आहे. महिला किंवा पुरूष हा दुजाभाव हा बघण्याचा दृष्टीकोन आहे. महाविकास आघाडीत मला महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आजपर्यंत तो गैरसमज होता महिलांना महिलांचे खातं दिलं जातं तो गैरसमज दूर झाला आहे.

आम्हीला सगळ्यांना एका गोष्टीची जाणीव आहे की आमच्याकडून अपेक्षा खूप आहेत. रोजगाराचा विषय, असो किंवा पर्यटनावर जास्तीत जास्त काम करायचं आहे. विशेषकरून आपल्या गड किल्ल्यांच्या संवर्धन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे गड किल्ल्यांच्या संवर्धनेकडे लक्ष देणार आहोत. असेही त्या मुलाकती दरम्यान म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -