फोन टॅपिंगप्रकरणी रश्मी शुक्लांना क्लीनचिट? न्यायालयात पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर

फोन टॅपिंगप्रकरणी रश्मी शुक्लांना क्लीनचिट? न्यायालयात पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर

राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना क्लीनचीट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी मुख्य दंडाधिकारी न्यायालयात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात जूनमध्ये 700 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना अटकेपासून 6 जुलैपर्यंत संरक्षण दिले होते, याच प्रकरणात पोलिसांकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.

2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेत्या संजय राऊत यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात कुलाब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वेगवेगळ्या कारणासाठी परवानगी घेत शुक्ला यांनी या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला. मात्र हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, या फोन टॅपिंग प्रकरणातील आरोपपत्रानंतर खटला चालविण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी मुंबई पोलिसांनी केंद्राकडे प्रस्ताव सादर केला होता. आता याप्रकरणी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी न्यायालयामध्ये अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये शुक्ला यांना क्लीनचीट देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी शुक्ला यांची चौकशी बंद होण्याची शक्यता आहे.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन; सेवासुविधा व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

First Published on: October 7, 2022 9:28 PM
Exit mobile version