घरमुंबईडॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ; सेवासुविधा व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ; सेवासुविधा व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

Subscribe

गेली दोन वर्षे होते कोरोनाचे सावट होते, मात्र यंदा मुक्त वातावरणात महापरिनिर्वाण दिन होणार साजरा होणार आहे. २०१९ धर्तीवर पुन्हा एकदा विविध सेवा-सुविधा देण्यात येणार आहे.

मुंबई -: भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिकेकडून आतापासूनच पूर्व तयारीला सुरुवात झाली आहे. सन २०२० व २०२१ या सलग २ वर्षे महापरिनिर्वाण दिनी कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर संबंधित नियमांचे पालन करुन अनुयायांनी आपले श्रद्धासुमन अर्पित केले होते. मात्र आता कोरोना नियंत्रणात आला आहे. त्यामुळे सण, उत्सव साजरे करण्यासाठी सरकार व पालिकेने निर्बंध उठवले. त्याचप्रकारे यंदाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त २०१९ च्या धर्तीवर दिलेल्या सर्व प्रकारच्या विविध सेवासुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी ६ डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिकेकडून देण्यात येणाऱ्या सेवासुविधा व पूर्व तयारी याबाबत पालिकेचे संबंधित अधिकारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्‍वय समितीचे व संबंधित संस्थांचे पदाधिकारी यांच्या समवेत महापालिका मुख्यालयात शुक्रवारी महत्वाची बैठक घेतली.
महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी, महापालिकेद्वारे सन २०१९ मध्ये दादर येथील चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात पुरविण्यात आलेल्या व्यवस्थेच्या व सोयी-सुविधांच्या धर्तीवर यंदाचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.

- Advertisement -

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, आशीष शर्मा, डॉ. संजीव कुमार, ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, मुंबई पोलिस दलाचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, सह आयुक्‍त (सुधार) रमेश पवार, उप आयुक्त रमाकांत बिरादार, संजय कु-हाडे, डॉ. संगीता हसनाळे, पोलिस उप आयुक्त प्रणय अशोक, पोलीस उप आयुक्त (वाहतूक) राजतिलक रोशन, सहाय्यक आयुक्त महेश पाटील, संबंधित अधिकारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्‍वय समितीचे व संबंधित संस्थांचे पदाधिकारी डॉ. भंते राहूल बोधी – महाथेरो, सरचिटणीस नागसेन कांबळे, उपाध्‍यक्ष महेंद्र साळवे, उपाध्‍यक्ष रवी गरुड, श्रीकांत भिसे, दिलिप थोरवडे आणि मान्यवर उपस्थित होते.

मार्च २०२० पासून सलग दोन वर्षे मुंबईत कोरोनाचा प्रादूर्भाव होता. त्यामुळे राज्य सरकार व पालिकेने काही निर्बंध घातले होते. सर्वधर्मिय लोकांना सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी, महापरिनिर्वाण दिन साजरे करण्यात काही अडचणी आल्या. पालिकेच्या विनंतीला मान देऊन सर्वधर्मीयांनी थोडक्यात सण, उत्सव साजरे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन नेहमीप्रमाणे साजरा करण्यात अडचणी आल्या होत्या. मात्र आता कोरोनावर नियंत्रण आले आहे. त्यामुळे सरकारने काही कडक निर्बध हटवले. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे महापरिनिर्वाण दिन मुक्त वातावरणात साजरा करता येणार आहे.

- Advertisement -

पालिकेच्या सेवासुविधा ; हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

या बैठकीप्रसंगी, पालिका परिमंडळ २ चे उप आयुक्त रमाकांत बिरादार यांनी, ६ डिसेंबर २०२२ च्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध सेवा-सुविधांची माहिती उपस्थितांना संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. यामध्ये प्रामुख्याने नियंत्रण कक्ष, सुशोभिकरण, टेहाळणी मनोरा, निर्देशक फुगा, छायाचित्रांचे प्रदर्शन, रांगेतील व्यवस्था, शासकीय मानवंदना, हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, माहिती पुस्तिका, स्वच्छता व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, निवासी मंडप, विद्युत व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, इत्यादी बाबींची माहिती उपस्थितांना देण्यात आली.


Digital Currency च्या दिशेने वाटचाल; पायलट प्रोजेक्टअंतर्गत होणार लॉचिंग, RBI ने सांगितला पूर्ण प्लॅन


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -