गणपतीसाठी अनारक्षित जादा डब्ब्यांची सेवा!

गणपतीसाठी अनारक्षित जादा डब्ब्यांची सेवा!

प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने पुन्हा एकदा मुंबईकर चाकरमान्यांसाठी एक खूषखबर दिली आहे. सध्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने काही ट्रेन्सना विशेष अनारक्षित डब्बे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया, कोणकोणत्या रेल्वे गाड्यांना जादा अनारक्षित डबे देण्यात आले आहेत याविषयी :


वाचा : गणपती स्पेशल ट्रेनला दिवा, पेणला अतिरिक्त थांबे


गाडी क्र. ०१०९५ –
लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते सावंतवाडी या गाडीला ११ आणि १८ सप्टेंबर रोजी अतिरिक्त डब्बे जोडले जाणार आहेत.
गाडी क्र. ०१०९६ – तर, परतीच्या सावंतवाडी-एलटीटी गाडीला १२ आणि १९ सप्टेंबर रोजी तीन डब्यांची जोड राहील.
गाडी क्र. ०११०३ – एलटीटी-सावंतवाडी गाडीला १३ आणि १५ सप्टेंबर या दिवशी अतिरिक्त डब्बे असणार आहेत.
गाडी क्र. ०११०४ – परतीच्या मार्गावर  सावंतवाडी ते एलटीटी विशेष गाडीत १४ आणि १६ सप्टेंबर रोजी हे डब्बे जोडले जातील.

या गणपती विशेष गाड्यांमध्ये यापूर्वीच चार अनारक्षित डब्बे जोडले गेले आहेत. आता त्यामध्ये आणखी तीन डब्यांची भर पडणार आहे.


खुशखबर : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास होणार टोल फ्री!

First Published on: September 10, 2018 9:39 PM
Exit mobile version