घरगणपती उत्सव बातम्यागणपती स्पेशल ट्रेनला दिवा, पेणला अतिरिक्त थांबे

गणपती स्पेशल ट्रेनला दिवा, पेणला अतिरिक्त थांबे

Subscribe

मध्य रेल्वेने गणपतीसाठी १३२ तर पश्चिम रेल्वे ४० विशेष फेऱ्या सोडल्या आहेत. चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी दिवा आणि पेण स्थानकात देखील थांबे देण्यात आले आहेत.

कोकणात गणपतीला होणारी गर्दी पाहता रेल्वेकडून गणपती स्पशेल गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर सोडलेल्या स्पेशल गाड्यांना चाकरमान्यांच्या सोयीसाठी यंदा दिवा आणि पेण स्थानकांत अतिरिक्त थांबे देण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने यंदा १३२ तर, पश्चिम रेल्वेने ४० विशेष फेऱ्या सोडल्या आहेत.

वाचा – ‘गणपतीक’ गावाक जाताय? मग तुमच्यासाठी खुशखबर

दिवा स्थानकांतील थांबे

ट्रेन क्र.०१००७ आणि ०१००७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -सावंतवाडी रोड स्पेशल दिवा स्थानकांत रात्री १.०४ वाजता येईल आणि १.०६ वाजता सुटेल.

- Advertisement -

ट्रेन क्र.०१००२ आणि ०१००८ सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही स्पेशल ट्रेन दिवा येथे रात्री २.२५ येईल आणि २.२७ वाजता सुटेल.

पेण स्थानकांतील थांबे

ट्रेन क्र.०१०३३ ही छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनस -रत्नागिरी स्पेशल पेण येथे दुपारी २.१८ वाजता येईल आणि २.१९ वाजता सुटेल.

- Advertisement -

ट्रेन क्र.०१०३४ ही रत्नागिरी -पनवेल स्पेशल पेण येथे सकाळी ६.१३ वाजता येईल आणि ६.१४ वाजता सुटेल.

ट्रेन क्र. ०१०३५ ही पनवेल -सावंतवाडी रोड स्पेशल पेण येथे सकाळी ८.३१ वाजता येईल आणि ८.३२ वाजता सुटेल.

ट्रेन क्र.०१०३६ ही सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल ट्रेन पेण येथे सकाळी ९.३० वाजता येईल आणि ९.३१ वाजता सुटेल.

ट्रेन क्र.०१४३५ ही पनवेल -सावंतवाडी रोड स्पेशल गाडी पेण येथे रात्री ११.२१ वाजता येईल आणि ११.२२ वाजता सुटेल.

ट्रेन क्र.०१४३६ ही सावंतवाडी रोड -पनवेल स्पेशल गाडी पेण येथे सायंकाळी ७.३० वाजता येईल आणि ७.३१ वाजता सुटेल.

ट्रेन क्र. ०१४४९ ही पनवेल -रत्नागिरी स्पेशल ट्रेन पेण येथे रात्री ११.१८ वाजता येईल आणि ११.१९ वाजता सुटेल.

ट्रेन क्र.०१४५० ही रत्नागिरी -पुणे स्पेशल पेण येथे सायंकाळी ७.२८ वाजता येईल ७.२९ वाजता सुटेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -