मी ब्राम्हणाला नगराध्यक्ष नाही तर मुख्यमंत्री झालेला पाहू इच्छितो, दानवेंचं वक्तव्य अन् शिवसेनेचा पलटवार

मी ब्राम्हणाला नगराध्यक्ष नाही तर मुख्यमंत्री झालेला पाहू इच्छितो, दानवेंचं वक्तव्य अन् शिवसेनेचा पलटवार

मी ब्राम्हणाला नगराध्यक्ष नाही तर मुख्यमंत्री झालेला पाहू इच्छितो असे वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. दानवेंच्या वक्तव्यानंतर शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला आहे. महाविकास आघाडीवर दानवे नेहमीच टीका करत असतात. मात्र यावेळी दानवेंनी ब्राम्हणाला मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा व्यक्त करत शिवसेनेवर टोला लगावला आहे. याला शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी दानवेंवर पलटवार केला आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना दौऱ्यावर होते. परशुराम जयंतिनिमित्त एका कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी म्हटलं आहे की, महानगरपालिकेच्या निवडणुका आल्याने आमच्याकडे लक्ष ठेवा, वेगवेगळ्या ठिकाणी ब्राम्हणांना प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या, एकापेक्षा जास्त ब्राह्मण जालना महापालिकेमध्ये निवडून द्या असा आपल्या बोलण्याचा अर्थ होता. पण ही विनंती मला लागू होत नाही. कारण मी ब्राह्मणाला केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष झालेला पाहू इच्छित नाही. मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री झालेला पाहू इच्छितो असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

शिवसेनेचा पलटवार

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्तुन खोतकर यांनी दानवेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. खोतकर म्हणाले की, खरंतर सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परशुरामच आहेत. यापूर्वीचे मुख्यमंत्री मनोहर जोशी हे सुद्धा परशुराम होते. त्यामुळे करु वगैरे या भानगडी सोडून द्या. दरम्यान खोतकर पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा माझ्या इतका कोणी जवळचा मित्र असेल असे वाटत नाही. फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला आनंदच आहे. तसेच ज्याच्याकडे विद्वत्ता आहे तो पुढे जाऊ शकेल आणि समाजामध्ये प्रचंड विद्वत्ता आहे असे अर्तुन खोतकर म्हणाले आहेत.


हेही वाचा : Election : राज्यात सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मतदान होणे शक्य नाही, राज्य निवडणूक आयोगाची माहिती

First Published on: May 5, 2022 2:03 PM
Exit mobile version