रविंद्रनाथ आंग्रे यांचा भाजपला रामराम!

रविंद्रनाथ आंग्रे यांचा भाजपला रामराम!

रविंद्रनाथ आंग्रे यांचा भाजपला रामराम!

माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट रविंद्रनाथ आंग्रे यांनी राफेल खरेदीतील भ्रष्टाचाराचा निषेध करत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. रविंद्रनाथ यांनी आता काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम यांनीही आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

हेही वाचा – सुभाष वेलिंगकरांचा संघाला रामराम!

काय म्हणाले रविंद्रनाथ आंग्रे?

रविंद्र आंग्रे यांनी आज गांधीभवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. त्यांनी ठाणे येथे गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी पथकात कार्यरत असताना ठाणे जिल्ह्यातील संघटीत गुन्हेगारी एकहाती मोडून काढली होती. मोदी सरकारने राफेल विमान खरेदीत घोटाळा करून सैनिकांचा अपमान केला आहे. त्यामुळेच आपण भाजप सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे असे रविंद्रनाथ आंग्रे म्हणाले. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात केला. अल्पसंख्यांक समाजाच्या हितासाठी फक्त काँग्रेस पक्षच काम करत आहे. त्यामुळे आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, असे मुनाफ हकीम म्हणाले.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. विविध पक्षातून काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढत चालला आहे. त्यामुळे राजकीय वारे कोणत्या दिशेला वाहत आहेत हे स्पष्ट होत आहे, असे खासदार अशोक चव्हाण म्हणाले आहेत.


हेही वाचा – अन गोटेंनी खडसेंसमोर चक्क हात जोडले

First Published on: November 20, 2018 7:26 PM
Exit mobile version