घरदेश-विदेशसुभाष वेलिंगकरांचा संघाला रामराम!

सुभाष वेलिंगकरांचा संघाला रामराम!

Subscribe

गोव्याचे माजी संघ प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी भाजप आणि संघाला रामराम ठोकला आहे. त्यांनी गोव्याच्या गोवा सुरक्षा मंच या पक्षात प्रवेश केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी संघाला रामराम ठोकला आहे. वेलिंगकर यांचे संघासाठी मोठे योगदान आहे. त्यांनी मनोहर पर्रिकर सारख्या अनेक बड्या नेत्यांना राजकारणात आणले आहे. रविवारी वेलिंगकर यांनी गोवा सुरक्षा मंच या पक्षात प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश करताच क्षणी त्यांची गोवा सुरक्षा मंचच्या पक्षप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या सात वर्षांपासून वेलिंगकर यांचे माध्यम प्रश्नांवर लढा चालू आहे. वेलिंगकर यांनी पक्षांतर करताना भाजपवर टीकास्त्रे सोडली. प्राथमिक शिक्षणाबाबत माध्यम प्रश्नावर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी विश्वास घात केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या विश्वासघाताचा बदला सरकारला भोगावा लागेल, असा इशारा वेलिंगकर यांनी दिला आहे.

हेही वाचा – ‘भाजप सत्तेसाठी मनोहर पर्रिकरांच्या जिवाशी खेळतंय’

- Advertisement -

वेलिंगकर ठरु शकतात भाजपला डोकेदुखी

वेलिंगकर हे मांद्रे मतदारसंघातून भाजपचे दयानंद सोपटे याच्या विरोधात पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय, येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक एकाच वेळी लढवली जाणार असल्याचे भाकित वर्तवले जात आहेत. या निवडणूकीत ३५ मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा वेलिंगकर यांनी केली आहे. त्याचबरोबर एकदा निवडणूक जाहिर होऊ दे, मग या सरकारचे सर्व कारनामे उघडे करीन असा इशा वेलिंगर यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत वेलिंगकर भाजपसाठी डोकेदुखी ठरु शकतात. त्याचबरोबर गोव्याच्या जडणघडणीत आपण सुरवातीपासून साक्षीदार असून निवडणूकीच्या कामासाठी आपण संघाचे बरेच कार्यकर्ते भाजपला दिले असल्याचे ते म्हटले. परंतु, या गोष्टीची आता खंत वाटत असल्याचेही ते म्हणाले.


हेही वाचा – मनोहर पर्रिकरांची प्रकृती स्थिर; गोव्यात नेतृत्व बदल नाहीच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -