धक्कादायक : पुण्यात माहिती अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला

धक्कादायक : पुण्यात माहिती अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला

विनायक शिरसाट यांचा संशयास्पद मृत्यू

पुण्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप शिरसाट यांच्या घरच्यांनी केला आहे. गेल्या आठ दिवसांपासून शिरसाट बेपत्ता असून आज त्यांचा ताम्हणी घाटात मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट हे ५ फेब्रुवारीपासून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता होते. त्यांचं अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी दिली होती. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी तपासही सुरु केला होता मात्र त्यांचा शोध लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी शिरसाट यांचं शेवटचं मोबाईल लोकेशन तपासले असता ते ताम्हिणी घाटात दाखवलं. त्यानुसार शोध घेत असताना पोलीस ताम्हिणी घाटात पोहोचले असता, सोमवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी शिरसाट यांचा ताम्हिणी घाटात मृतदेह सापडला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

वाचा – सुसाईड नोट लिहून बेपत्ता झालेल्या ‘त्या’ कुटुंबाचे झाले तरी काय?

वाचा – कोट्यावधीच कर्ज काढून कुटुंब बेपत्ता


 

First Published on: February 12, 2019 7:39 AM
Exit mobile version