घरमहाराष्ट्रकोट्यावधीच कर्ज काढून कुटुंब बेपत्ता

कोट्यावधीच कर्ज काढून कुटुंब बेपत्ता

Subscribe

कोट्यावधी रुपयांचे कर्ज काढून एक कुटुंब पसार झाल्याची घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. पसार होण्यापूर्वी यांनी आत्महत्या करतो अशी चिठ्ठी लिहिली असल्याने नेमके ते गेले कुठे? याचा शोध पोलीस अधिकारी घेत आहे.

कर्जबाजारी झाल्याने पिंपरी चिंचवडमधील एक कुटुंब सुसाईड नोट लिहून दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालं होतं. ५ डिसेंबर पासून आई-वडील आणि दोन्ही मुलं घर सोडून आत्महत्या करतो असं चिट्ठीत नमूद करून बेपत्ता झाले. संतोष शिंदे, सविता शिंदे असं दाम्पत्यांचं तर मुकुंद शिंदे आणि मैथली शिंदे अशी मुलांची नावं आहेत. दोन ते अडीच कोटींचे अंगावर कर्ज असून ते दोन महिन्यानंतर ही बेपत्ता आहेत. त्यांचा ठावठिकाणा लागताना दिसत नाही. पिंपरी पोलीस अद्यापही त्यांचा शोध घेत आहेत. परंतु,त्यांना यश येताना दिसत नाही.

सुसाईड नोट लिहून बेपत्ता

शिंदे कुटुंब हे डिसेंम्बर महिन्यात सुसाईड नोट लिहून बेपत्ता झाले होते. त्यानंतर दोन महिन्यात पिंपरी पोलिसांनी नातेवाईक,शेजारी,ओळखीच्या व्यक्तींकडे चौकशी केली परंतु, अद्यापही ते कुटुंब गेले कुठे असा ठोस पुरावा पोलिसांना मिळत नाही. त्यामुळे त्या कुटुंबाचे झाले तरी काय असा प्रश्न निर्माण होत आहे. संतोष शिंदे यांच्यावर कोट्यवधींच कर्ज होत काही महिन्यांपासून ते कर्जाचे हप्ते भरू शकत नव्हते. बँकांनी त्यांच्या मागे ससेमिरा सुरू ठेवला होता.त्यामुळे आता बँक मालमत्ता जप्त करणार आहे हे लक्ष्यात येताच शिंदे कुटुंब सुसाईड नोट लिहून बेपत्ता झालं होत. अनेक बँकांकडून त्यांनी कर्ज घेतल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

काय लिहिले आहे सुसाईड नोटमध्ये

“कर्जबाजारीपणाला मी एकटाच जबाबदार असल्याने अन्य कोणाला दोषी धरू नये. मी स्वतःच घर सोडून निघून चाललो आहे. आम्ही चौघे ही आत्महत्या करणार आहोत, हा आमचा सर्वस्वी निर्णय आहे.”,असं नमूद करण्यात आलं होतं.चौघांनी ही मोबाईल कपाटाचा चाव्या घरात सोडून गेले होते. दरम्यान,दोन महिने उलटून देखील त्यांचा थांगपत्ता लागत नाही.त्यामुळे ते दुसऱ्या नावाने परराज्यात तर स्थायिक झाले नाहीत ना असा प्रश्न निर्माण होत असून त्या कुटुंबाचे झाले तरी का अशी चर्चा शहरात सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -