शेतकरी आंदोलन: शहाणपणाची भूमिका घेणं गरजेचं; पवारांचा केंद्राला सल्ला

शेतकरी आंदोलन: शहाणपणाची भूमिका घेणं गरजेचं; पवारांचा केंद्राला सल्ला

केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणासह देशातील इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्रे आंदोलन छेडले आहे. गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. शेतकऱ्यांचा आंदोलन मिटवण्यासाठी पाचवेळा शेतकरी संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा केली. मात्र, या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांनी छेडलेल्या आंदोलनावरून केंद्रातील मोदी सरकारला सावधगिरीचा इशारा दिला आहे.

शरद पवार यांनी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. त्यानंतर शरद पवार संजय राऊत यांच्या भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना केंद्राला शहाणपणाची भूमिका घेणं गरजेचे आहे, असा सल्ला दिला.

आपण संपूर्ण देशाची शेती आणि अन्न पुरवठा बघितला, तर सगळ्यात जास्त योगदान पंजाब व हरयाणातील शेतकऱ्यांचे आहे. विशेषतः गहू आणि तांदूळ यांच्या उत्पादनात देशाची गरज या शेतकऱ्यांनी भागवली. पण त्याचबरोबर जगातील १७-१८ देशांना धान्य पुरवण्याचे काम भारत करतो. त्यात पंजाब आणि हरयाणाचा वाटा फार मोठा आहे. ज्यावेळी पंजाब व हरयाणातील शेतकरी रस्त्यावर येतो, त्याची फार गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे होती. पण, दुर्दैवाने ती घेतलेली दिसत नाही. मला स्वतःला असे वाटते की, हे असेच जर राहिले, तर ते दिल्लीपुरते सीमित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतली. अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी, अशीच माझी अपेक्षा आहे,” असा सल्ला शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे.


हेही वाचा – शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी घेतली संजय राऊतांची भेट


 

First Published on: December 6, 2020 12:23 PM
Exit mobile version