घरमुंबईशरद पवारांसह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी घेतली संजय राऊतांची भेट

शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी घेतली संजय राऊतांची भेट

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शिवसेना खासदार, प्रवक्ते आणि नेते संजय राऊत यांची त्यांच्या भांडुप येथील घरी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. संजय राऊत यांच्यावर चार दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी राऊत यांच्या घरी भेट घेतली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज शरद पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. त्यानंतर शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीसाठी भांडुप येथे रवाना झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हेसुद्धा सोबत होते. संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवारांनी त्यांची भेट घेतली असल्याचं बोलले जात आहे.

- Advertisement -

खासदार संजय राऊत यांच्यावर यशस्वी अँजिओप्लास्टी

शिवसेनेचे खासदार, मुख्य प्रवक्ते आणि नेते संजय राऊत यांच्यावर गुरुवारी दुपारी लिलावती रुग्णालयात यशस्वीरित्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या हृदयात दोन स्टेन टाकण्यात आल्या असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. डॉ. सॅम्युअल मॅथ्यू आणि डॉ अजित मेनन यांनी ही शस्त्रक्रिया केली. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर संजय राऊत यांच्या शस्त्रक्रियेवेळी लिलावती रुग्णालयात उपस्थित होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -