हातातील खंजीर बाजूला ठेवून बाळासाहेबांना अभिवादन करा; राऊतांचा मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटाला टोला

हातातील खंजीर बाजूला ठेवून बाळासाहेबांना अभिवादन करा; राऊतांचा मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटाला टोला

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 17 नोव्हेंबर म्हणजे गुरुवारी स्मृतीदिन आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवाजी पार्कामधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाऊन अभिवादन करणार आहेत. दरम्यान उद्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीय देखील स्मृतीस्थळावर अभिवादनासाठी येतील. यासोबत मोठ्या संख्येने शिवसैनिकही याठिकाणी दाखल होती. मात्र शिवसेनेतील बंडखोरीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मृतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाद निर्माण होऊ नये म्हणून आजच जाऊन अभिवादन करणार आहेत. याच मुद्द्यावरून आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. हातातील खंजीर बाजूला ठेवून बाळासाहेबांना अभिवादन करा. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. (shiv sena mp sanjay raut slams cm eknath shinde visits balasaheb thackeray smriti sthal)

संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातील खंजीर बाजूला ठेवा आणि स्मारकाला हात जोडायला जा. कोणीही असतील त्यांनी आपल्या हातातील खंजीर बाजूला ठेवा आणि बाळासाहेबांना नमस्कार करण्यासाठी, आशिर्वाद घेण्यासाठी जा. कोणाचं व्यक्तिगत नाव घेत नाही. म्हणत त्यांनी शिंदे गटावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

बाळासाहेब अशी एक आत्मा आहे, जे सर्व काही पाहत आहेत की पुढे काय होणार आहे. ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसतात त्यांच कधी भलं झालं नाही, हा इतिहास आहे. सर्वजण बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊ शकतात, पण चांगल्या मनाने जा. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.


ठाकरे गटाला पुन्हा मोठा झटका; पालघर जिल्हाप्रमुखासह सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश


First Published on: November 16, 2022 11:16 AM
Exit mobile version