घरमहाराष्ट्रठाकरे गटाला पुन्हा मोठा झटका; पालघर जिल्हाप्रमुखासह सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश

ठाकरे गटाला पुन्हा मोठा झटका; पालघर जिल्हाप्रमुखासह सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश

Subscribe

वसंत चव्हाण यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून बोईसर, विक्रमगड विधानसभा क्षेत्र आणि पालघर जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती

मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमजारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूड पडली. शिंदे गटविरुद्ध ठाकरे गट असे दोन गट शिवसेनेत झाले. या दोन्ही गटाकडून आता शिवसेनेवर आपले वर्चस्व गाजवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासोबत ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढतेय. त्यामुळे ठाकरे गटात आता मोठ्या गळती लागली आहे. अशात शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या पालघरमधूनही ठाकरे गटाला मोठा झटका मिळाला आहे. पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सदस्य आणि पालघर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी मुख्यमंत्री तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून वसंत चव्हाण यांची बोईसर आणि विक्रमगड विधानसभा क्षेत्र आणि पालघर जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला पालघर जिल्ह्यात मोठा फटका बसला आहे.

- Advertisement -

सुरुवातीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले शिलेदार आता हळूहळू बाळासाहेबांची शिवसेना पक्षात येऊन दाखल होऊ लागल्याने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील आजी माजी शिवसेना पदाधिकारी आता हळूहळू शिंदे यांना समर्थन देऊन पक्षात प्रवेश करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे सदस्यही वसंत चव्हाण यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने शिंदे यांचही जिल्ह्यातील बळ अधिक वाढलं आहे.

या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी आमदार आणि पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे, माजी नगरसेवक राम रेपाळे आणि पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


हेही वाचा : मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना…; श्रद्धा हत्या प्रकरणावर केतकी चितळेची पोस्ट चर्चेत

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -