दोन दिवसांत राज्यात जिम सुरू

दोन दिवसांत राज्यात जिम सुरू

केंद्र सरकारच्या नियमावलीनंतर राज्यातील जिम सुरू करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून राज्य सरकारने येत्या दोन दिवसांत राज्यातील जिम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आगमी दोन दिवसांत राज्यात जिम सुरू करणार, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

राज्य सरकाने जिम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून शनिवारपर्यंत या आदेशांवर सही करणार असल्याचे विजय वड्डेटीवर यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपाकडून जिम सुरू करण्याबाबत मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आज जिम सुरू करण्यासाठी सरकार तयार असल्याचे विजय वड्डेटीवर यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॅाकडाऊन लागू करण्यात आला. तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रातील जिम व्यवसाय बंद आहे. त्यामुळे यावर अवलंबून असणार्‍या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर जिम चालक- मालकांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेऊन अनेक समस्या मांडल्या होत्या. यानंतर राज ठाकरे यांनी तुम्ही जिम सुरू करा. जिम सुरू केल्यानंतर कोण कारवाई करतेय बघू, असे राज ठाकरेंनी सांगितले होते.

त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यातील जिम तात्काळ सुरू करण्यात याव्यात आणि हळूहळू सर्वच क्षेत्रांचा विचार करून अर्थकारणाला चालना देण्यासाठी त्या-त्या क्षेत्रांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी, अशी मागणी केली होती. राज ठाकरेंनी घेतलेला पवित्रा आणि देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राचा इम्पॅक्ट आता झाल्याचे दिसून येत आहे.आगमी दोन दिवसांत राज्यात जिम सुरू करणार, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

First Published on: August 15, 2020 6:45 AM
Exit mobile version