गार्डन प्लॉट येथील बेकायदा बांधकाम बंद करून सील करा; मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

गार्डन प्लॉट येथील बेकायदा बांधकाम बंद करून सील करा; मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

संग्रहित छायाचित्र

मुंबई – अंधेरी पश्चिम येथील गार्डन प्लॉटमधील बेकायदा बांधकाम बंद करून सील करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. अंधेरी पश्चिम येथील के.ईस्ट वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार अमित साटम, भारती लव्हेकर सर्व विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंधेरी पूर्वसाठी उद्या मतदान, भाजपाची माघार पण सात उमेदवार रिंगणात, कोण मारणार बाजी?

पालकमंत्री लोढा यावेळी म्हणाले की, गार्डन प्लॉट परिसरातील माहिती घेऊन प्रशासनाने या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. लल्लूभाई पार्क, सूर्या रुग्णालय परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने स्थानिक पोलीस चौकीने तात्काळ कारवाई करावी. जोपर्यंत सुरक्षा रक्षक नियुक्त होत नाहीत तोपर्यंत तिथे पोलीस स्टेशनने स्थानिक पोलीस सुरक्षेसाठी नेमावेत असे निर्देश पालकमंत्री लोढा यांनी दिले.

नागरिकांनी विविध २३३ विषयासंदर्भात आपले तक्रार अर्ज सादर केले. यामधील 87 अर्जदारांनी पालकमंत्री यांच्यासमोर उपस्थित राहून प्रत्यक्ष समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

मला मुंबईच्या सामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याची इच्छा, अमृता फडणवीसांनी नाकारली सुरक्षा

‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रमामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी https://mumbaisuburban.gov.in तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका संदर्भात तक्रारीसाठी portal.mcgm.gov.in या लिंक वरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

First Published on: November 2, 2022 7:21 PM
Exit mobile version