terrorist arrest : मुंबईत दहशतवाद्यांना पकडणं धोक्याची घंटा, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

terrorist arrest : मुंबईत दहशतवाद्यांना पकडणं धोक्याची घंटा, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

Goa Election Devendra fadnavis slams congress tmc in goa tour

दिल्ली पोलिसांनी एकूण सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. तर सणासुदीच्या काळात दिल्लीच्या पोलिसांनी दहशतवाद्याला मुंबईतील धारावीमधून अटक केली आहे. मुंबईसारख्या शहरात दहशतवाद्यांना पकडणं धोक्याची घंटा असल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. देहशात दहशतवादी वृत्तीच्या लोकांना पकडले जाणे ही खूप गंभीर बाब असून अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचले पाहिजे असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतील ३ भागांत स्फोट घडवण्याचा हेतु या दहशतवाद्यांचा होता. तसेच दिल्लीच्या पोलिसांनी महाराष्ट्रात येऊन दहशतवाद्यांवर कारवाई केली तर मुंबई पोलीस आणि राज्यातील एटीएस पथक झोपा काढत होते का? असा सवाल भाजपने राज्य सरकारला केला आहे.

दिल्लीतील दहशतवाद्यांचे धारावी कनेक्शन समोर आल्यामुळे राज्यात आणि मुंबईत एकच खळबळ माजली आहे. मुंबईत दहशतवादी सापडल्यामुळे ही धोक्याची घंटा आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, देशामध्ये आणि मुंबईसारख्या शहरात दहशतवाद्यांना पकडणं ही धोक्याची घंटा आहे. या प्रकरणात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जे आतंकवादी देशात घुसले आहेत आणि जिथे राहत आहेत. अशा लोकांचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. तसेच अशा लोकांना संपवलं पाहिजे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज्य एटीएस झोपले होते का?

दिल्लीच्या पथकाने दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं असून त्यांचे आता मुंबई कनेक्शन समोर आलं आहे. मुंबईत हे दहशतवादी घातपाताच कट करत असताना राज्याच्या एटीएस पथकाला याची माहिती नव्हती का? गृहमंत्र्यांना याबाबत काही माहिती होती का? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. राज्यातल्या एका आमदारावर लुक आऊट सर्क्युलर काढण्याचा प्रकार करणारे आमच्या राज्याचे पोलीस या दहशतवाद्यांच्या बाबतीत का झोपले होते. याबाबतीत गृहमंत्री भूमिका स्पष्ट करतील का? या सगळ्या प्रकारची माहिती राज्यातील पोलिसांना होती का? गृहमंत्र्यांना होता का? त्यांना कल्पना होती तर त्यांनी काय भूमिका घेतली? हे गृहमंत्र्यांनी स्पष्ट करावं असे आवाहन आशिष शेलार यांनी केलं आहे.


हेही वाचा : केंद्रीय मंत्र्यांना अटक, नेत्यांविरोधात कारवाई करण्यात ठाकरे सरकार मग्न, शेलारांचे टीकास्त्र

हेही वाचा : Terrorist : महाराष्ट्र पोलिसांचे इंटेलिजन्स फेल्युअर नाही – गृहमंत्री

हेही वाचा :  दिल्लीतील दहशतवाद्याचे धारावी कनेक्शन, गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीने महत्त्वाची बैठक


 

First Published on: September 15, 2021 2:25 PM
Exit mobile version