‘इलेक्शन बजेट’वर विधानसभेत आज होणार चर्चा, विरोधक-सत्ताधारी पुन्हा भिडणार

‘इलेक्शन बजेट’वर विधानसभेत आज होणार चर्चा, विरोधक-सत्ताधारी पुन्हा भिडणार

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सादर केला. पंचामृत ध्येयावर आधारित असलेल्या या अर्थसंकल्पात शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, बीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा, पर्यावरणपूरक विकास आदी घटकांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. परंतु, या बजेटवर विरोधकांनी तोंडसुख घेतलं आहे. हे इलेक्शन बजेट असल्याची टीकाही विरोधकांनी केली. काल सादर झालेल्या या अर्थसंकल्पावर आज विधिमंडळात चर्चा होणार आहे.

हेही वाचा – फडणवीसांचे इलेक्शन बजेट

राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचे फुलोरे, स्वप्नांचे इमले आणि घोषणांचा सुकाळ आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता यातील किती गोष्टींची फलश्रृती होईल याबाबत शंकाच आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने एक अभ्यासू अर्थमंत्री मिळाला असे वाटले होते, मात्र अर्थसंकल्प कसा लिहावा? हे पुस्तक लिहिणे आणि खराखुरा अर्थसंकल्प लिहिणे यात खूप फरक आहे. अर्थसंकल्प कसा लिहावा यात अर्थमंत्री कमी पडले, अशी जोरदार टीका करीत राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे दूरदृष्टीचा अभाव आणि वास्तवाचे भान नसणारा अर्थसंकल्प असल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

हेही  वाचा – अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे; अजित पवारांची खोचक टीका

“आजचा अर्थसंकल्प पाहिल्यावर सर्व समाजातील घटकांना मधाचं बोट लावण्याचा आणि भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुंबईत गडगडाट झाला पण पाऊस पडला नाही. त्यामुळे गरजेल तो बरसेल काय? असा सवालही ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, या अर्थसंकल्पाचं मी गाजर हलवा असं वर्ण करेन. आम्हीच जाहीर केलेल्या योजनांचं नामांतर करून या योजना पुढे मांडल्या आहेत. आपला दवाखाना योजनेमुळे त्यावेळी यांना फिता कापायचे भाग्य मिळायंच. तीच योजना आज राज्यात राबवणार आहेत. शेतकऱ्यांना १२ हजार रुपयांची भरघोस मदत केली. पण त्यांनाहमखास भाव कसा मिळणार याबाबत वाच्यता नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हेही वाचा गरजेल तो बरसेल काय? राज्याचा अर्थसंकल्प गाजर हलवा, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

उद्धव ठाकरेंच्या या प्रतिक्रियेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला. आम्ही गाजर हलवा तरी दिला. त्यांनी तर काहीच दिले नाही. त्यांनी स्वतःच सर्व खल्लं, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

हेही वाचा – फडणवीसांनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अर्थसंकल्पाचे कौतुक

First Published on: March 10, 2023 8:02 AM
Exit mobile version