घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023फडणवीसांनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अर्थसंकल्पाचे कौतुक

फडणवीसांनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अर्थसंकल्पाचे कौतुक

Subscribe

मुंबईः देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला. आम्ही गाजर हलवा तरी दिला. त्यांनी तर काहीच दिले नाही. त्यांनी स्वतःच सर्व खल्लं, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव यांना टोला लगावला. तसेच आमचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना सुरु केली आहे. त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असा दावा मुख्यमंंत्री शिंदे यांनी केला आहे. हा अर्थसंकल्प अभ्यासपूर्ण होता, असे देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

- Advertisement -

गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे मुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक केले. अडीच वर्षे विकासाचा मेगाब्लॉक सुरु होता. हा मेगाब्लॉक आम्ही अर्थसंकल्पाच्या माध्यमातून संपवला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

विरोधकांकडे टीका करण्यासारखा काहीच मुद्दा नाही. त्यांना विश्वास नव्हता की आम्ही अर्थसंकल्प सादर करु. पण आम्ही अर्थसंकल्प सादर केला. भरीव तरतुदी केल्या. सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प आहे. प्रत्येक घटकाला अर्थसंकल्पात न्याय देण्यात आला आहे. तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा विचार करुन हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. नमो शेतकरी योजना ऐतिहासिक आहे. या योजनेमुळे नक्कीच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

- Advertisement -

महाराष्ट्रात पहिल्यांदाच लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली आहे. महिलांचा सन्मान करणारा हा अर्थसंकल्प आहे. त्याचबरोबर हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या कुटुंबासाठी. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खास योजना आम्ही तयार केल्या आहेत. सर्वाधिक प्रकल्प महाराष्ट्रात सुरु आहेत. वेगाने महाराष्ट्राची प्रगती सुरु आहे. कारण या अर्थसंकल्पात आरोग्यापासून रोजगारापर्यंत सर्वच गोष्टींचा विचार करण्यात आला आहे, असे कौतुक मुख्यमंत्री शिंदे यांनी अर्थसंकल्पाचे केले आहे.

हेही वाचा- अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे; अजित पवारांची खोचक टीका

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -