मुंबई तापणार; राज्यातील ‘या’ भागात उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा

मुंबई तापणार; राज्यातील ‘या’ भागात उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा

मुंबई | राज्यातील काही भागात आज उष्णतेच्या (Heatstroke) लाटेचा इशारा हवामान विभागाने (India Meteorological Department) दिला आहे. पुढील दोन दिवस कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांने वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. दरम्यान, मुंबईत (Mumbai) गुरुवारी कमाल तापमना ३६.९ डिग्री सेल्सिअस एवढे उच्चांकी नोंदल्यामुळे नागरिकांचे हाल झाले होते. त्याचबरोबर मुंबईतील बहुतांशी एमएमआर रिजनमध्ये देखील कमाल तापमानात वाढ झाली आहे. यात ठाण्यातील कमाल तापमान ३८ डिग्री सेल्सिअस एवढे नोंद झाली. तसेच मध्य महाराष्ट्रात (Maharashtra) आज काही भागात उष्णतेच्या लाटेचा दिला आहे.

दरम्यान, मुंबईत गुरुवारी सकाळी उष्मांक वाढला होता. यामुळे मुंबईकरांची काहिली झाली होती. मुंबईत गेल्या दोन दिवसापासून उष्णतेत वाढ झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. मुंबईतील उपनगराचे तापमान ३६.९ डिग्री सेल्सिअस तर, शहरातील तापमान ३४.२ डिग्री सेल्सिअस एवढे नोंदविले. तसेच मुंबई उपनगर आणि शहरात अनुक्रमे ६७ आणि ७७ टक्के आर्द्रता नोंदविली. तसेच आज मध्य महाराष्ट्र जळगाव, नांदेड, नंदूरबारमध्ये उष्णतेच्या लाटांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे आणि पालघर या दोन दिवस उष्णतेच्या लाटांचा इशारा दिला आहे.

हेही वाचा – राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू; जाणून घ्या हवामान विभागाने काय म्हटलंय…

दुहेरी वातावरणामुळे राज्यात ‘ही’ स्थिती

“इस्टर्ली वाऱ्याचा प्रभाव त्याचबरोबर अँटी सायक्लॉन स्थिती अशा दुहेरी वातावरण परिस्थितीमुळे तापमानात वाढ झाली आहे. ही स्थितीत एक किंवा दोन दिवस असणार असून यानंतर वातावरण सामान्य होणार आहे”, अशी माहिती मुंबई वेधशाळेच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रतेत गुरुवारी वाढली होती. मोचा चक्रीवादळ रुपांतर झाले. हे वादळी प्रणाली बांग्लादेश आणि म्यानमारच्या दिशेने जात आहे. तसेच रविवारपर्यंत (ता. १४) किंनापट्टीला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

 

 

 

First Published on: May 12, 2023 1:00 PM
Exit mobile version