खरी शिवसेना कोणाची! ठाकरेंची की शिंदे गटाची? निवडणूक आयोगात युक्तिवाद सुरु

खरी शिवसेना कोणाची! ठाकरेंची की शिंदे गटाची? निवडणूक आयोगात युक्तिवाद सुरु

शिवसेनेतील मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार आणि 12 खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले. या बंडखोरीमुळे शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात खरी शिवसेना कोणाची यावरून वाद सुरु झाला आहे. हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेले, मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आलं आहे. ज्यावर आता निवडणुकीत आयोगात युक्तीवाद सुरु झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन मविआ सरकारमधून बाहेर पडले. ज्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना आमचीच असा दावा केला आहे. तर उद्धव ठाकरेंनीही खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. यासह दोन्ही नेत्यांकडून शिवसेनेसह धनुष्यबाणावर आपला दावा केला जात आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. मात्र निवडणूक आयोगाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपवले असून आजपासून शिवसेना नेमकी कोणाची यावर निवडणूक आयोगासमोर प्रत्यक्ष युक्तीवाद सुरु होणार आहे.

दरम्यान खरी शिवसेना कोणाची हे सिद्ध करण्यासाठी दोन गटाकडून प्रयत्न सुरु आहेत. आता यावरील कायदेशीर लढाई निवडणूक आयाोगासमोर पोहचली आहे. याच माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत 20 लाख प्राथमिक सदस्यांचे अर्ज आणि तीन लाख पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर सादर केली. यावर आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटाला पक्षाचे प्राथमिक सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र विशिष्ट स्वरुपात सादर करण्यासाठी 9 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती.

राज्यसभा सदस्य (उद्धव गट) अनिल देसाई माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने निवडणूक आयोगासमोर कायदेशीर लढाईचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी आयोगासमोर पदाधिकाऱ्यांचे सदस्यत्व अर्ज आणि पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याची पुष्टी केली आहे. यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत 20 लाख प्राथमिक सदस्यांचे फॉर्म जमा केले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वतीने 10.3 लाख प्राथमिक सदस्यांचे फॉर्म आणि 1.8 लाख पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर सादर केल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान शिवसेनेतील या ऐतिहासिक बंडखोरीच्या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पराभव केला. यात उद्धव ठाकरेंविरोधात ते बंडखोरी करून भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. त्यांनी शिवसेनेचे सुमारे 40 आमदार आणि 12 खासदारांना आपल्यासोबत नेले. त्यामुळेच निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


आधी मक्का आणि आता वैष्णोदेवी; ‘पठाण’च्या प्रदर्शनापूर्वी शाहरुख देतोय धार्मिक स्थळांना भेट

First Published on: December 12, 2022 11:37 AM
Exit mobile version