शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना अल्टिमेटम, आजच्या बैठकीत हजरा राहा, अन्यथा…

शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना अल्टिमेटम, आजच्या बैठकीत हजरा राहा, अन्यथा…

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकारणात वेगाने बदल घडत आहेत. आता नुकतीच मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेने आपल्या बंडखोर आमदारांना अल्टिमेटम दिला आहे. आज सायंकाळी ५ वाजता शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. या बैठकीला हजर न राहिल्यास पक्षाकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. (Ultimatum to MLA’s from shivsnea )

हेही वाचा – मला हार्ट अटॅक आलाच नाही, बळजबरीने इंजेक्शन टोचलं; नितीन देशमुखांनी सांगितली आपबिती

शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय यांच्याकडून एक प्रसिद्धी पत्रक प्रत्येक आमदाराला पाठवण्यात आले आहे. त्यानुसार, त्यांना आज सायंकाळी ५ वाजता बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर या बैठकीला हजर राहिले नाही तर शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा इरादा पक्का आहे, असं समजलं जाईल, असं या पत्रकात म्हटलं आहे. त्यामुळे पाच वाजताच्या बैठकीत कोण कोण उपस्थित राहणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा महाराष्ट्राच्या राजकारणात कोरोनानाट्य, राज्यपालांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण

काय लिहिलंय या पत्रात?

पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बुधवारी २२ जून २०२२ रोजी वर्षा बंगला येथे सायंकाळी ५ वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी.
सदर सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठविली आहे. त्या व्यतिरिक्त आपण समाज माध्यमे, व्हॉट्सअॅप आणि एस.एम.एस द्वारे कळवले आहे. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास गैरहजर राहता येणार नाही.

हेही वाचा एकनाथ शिंदेंना सोडणं आम्हालाही परवडणारं नाही, संजय राऊत हतबल

सदरहू बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा असे मानले जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

 

First Published on: June 22, 2022 2:19 PM
Exit mobile version