UPSC 2022 : सोलापुरातील शेतकऱ्याचा मुलगा झाला IAS; 493व्या रँकने उतीर्ण; वाचा सविस्तर

UPSC 2022 : सोलापुरातील शेतकऱ्याचा मुलगा झाला IAS; 493व्या रँकने उतीर्ण; वाचा सविस्तर

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC 2022 Results) परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी अधिक गुणांनी यश मिळविले. विशेष म्हणजे यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसलाखुर्द येथील ऐका सेवानिवृत्त एसटी चालकाचा मुलगा शशिकांत दत्तात्रय नरवडे हा आई वडिलांचे प्रोत्साहन व सारथीच्या स्काँलरशिपमुळे युपीएससी 2023मध्ये 493व्या रँकने उतीर्ण होत आयएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. शशीकांत नरवडेच्या यशाने सर्वत्र अभिनंदन होत आहे. (upsc 2022 results shashikant dattatray narvade son of retired st conductor ias overcame success)

मसलाखुर्द येथील दत्तात्रय नरवडे यांना अवघी अडीच एकर शेती आहे. ते एसटी वाहक पदावर काम करत होते. दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. घरची परिस्थिती गरीब आणि वडिलांचा पगारही तुटपुंजी होता. मात्र तरीही पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा, मसलाखुर्दमध्ये झाले. दहावीपर्यंत सरस्वती विद्यालय, लातूरमधून झाले. 12वीचे शिक्षण शाहु विद्यालय लातूर तर इंजिनियरींग शिक्षण वालचंद कॉलेज सांगलीमधून घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शशिकांत स्पर्धा परिक्षा देत राहिला.

स्पर्धा परीक्षा देत असातना त्याला एकदा तीन मार्कांनी अपयश आले होते. मात्र त्याच्या आईने त्याला खंबीर साथ दिली. आई वडिलांनी तू पास होईल शिकत, परीक्षा देत राहा असे पाठीवर हात टाकून लढण्याचे बळ दिले. पुढे शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. घरच्यांनी दिलेल्या बळानंतर शशिकांत दिल्लीत पोहोचला. दिल्लीमध्ये गेल्यानंतर सारथीची स्काँलरशिप मिळाल्याने आई वडिलांवरील अर्थिक भार कमी झाला. त्यानंतर अहोरात्र अभ्यास करुन मग स्पर्धा परिक्षा पास झाला आहे.

दरम्यान, एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 12 टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून कश्मिरा संख्ये प्रथम आली असून तिने देशात 25 वा क्रमांक पटकावला.


हेही वाचा – ‘शिंदे-फडणवीसांनी आम्हाला शब्द दिला आहे की…’, प्रताप सरनाईकांचे मंत्रिमंडळ विस्तारावर सुतोवाच

First Published on: May 23, 2023 10:48 PM
Exit mobile version