पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट लवकरच कमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट लवकरच कमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

‘शिवसेना-भाजपा (Shivsena and bjp) युतीचे सरकार याबाबत लवकरात लवकर निर्णय घेईल आणि व्हॅट (VAT) कमी करेल’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले. महाराष्ट्रात इंधनावरील व्हॅट कमी केल्यास पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून सर्वसमान्यांना होणाऱ्या आर्थित तोट्यातून दिलासा मिळणार आहे. (vat of petrol and diesel will less in next few days says cm eknath shinde)

विधीमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू आहे. यावेळी सभागृहात बोलताना एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. “जागतीक बाजार पेठेत तेलाच्या किंमती वाढल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कर कमी केला होता. त्यावेळी त्यांनी इतर राज्यांनाही व्हॅट कमी करण्याची विनंती केली होता. त्यानंतर इतर राज्यांनी काही ठिकाणी व्हॅट कमी केला होता. पण महाराष्ट्राने व्हॅट कमी केला नव्हता. पण शिवसेना-भाजपा युतीचे सरकार याबाबत लवकरात लवकर निर्णय घेईल आणि व्हॅट कमी करेल”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

हेही वाचा – केंद्रानंतर राज्याचाही दिलासा, पेट्रोल 2.8 पैशांनी तर डिझेल 1.44 पैशांनी स्वस्त

“व्हॅट कमी करून सर्वसामन्यांना दिलासा देण्याचे काम आमचे युतीचे सरकार करेल. तसेच, या राज्यातील महत्वाचा घटक असलेला बळीराज्यासाठी हे सरकार एवढे करेल की शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र आम्ही करू. त्याकरीता विरोधीपक्षाचे आणि इतरांचे आम्हाला मोलाचे सहकार्य लागेल. यासाठी सत्ताधारी आणि विरोधी असे आपण दोन्ही पक्ष एकत्र येऊन शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडवू”, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य सरकारनेही सकारात्मक पाऊल उचलले आहे. मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्व सामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. मात्र, आता युतीचे सरकार व्हॅट कमी करणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.


हेही वाचा – राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड

First Published on: July 4, 2022 5:27 PM
Exit mobile version