महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणाला मुसळधार पावसाचा फटका; १२८ गावांचा संपर्क तुटला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणाला मुसळधार पावसाचा फटका; १२८ गावांचा संपर्क तुटला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

राज्यासह अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचले आहे. तसेच, या पावसाने पूर्व महाराष्ट्रामधील गडचिरोलीतील १२८ गावांचा संपर्क तुटल्याचे समजते. शिवाय, भारतीय हवामान विभागाने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुढील चार दिवस दिल्ली, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र (Maharashtra), छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये हलका ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

महाराष्ट्रासह तेलंगणातही हवमान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी मुख्य सचिव सोमेश कुमार यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. “राज्यातील सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने कराव्यात. पावसाळ्यात कोणताही धोका पत्करू नये आणि अत्यावश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये”, असे आवाहन त्यांनी व्हिडिओ कॉन्फेरेन्सींगच्या माध्यमातून केले.

सध्यस्थितीत दक्षिण भारतातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून, तेलंगणामध्ये रविवारपर्यंत रेड अलर्ट कायम आहे. शिवाय, कर्नाटक आणि केरळमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, महाराष्ट्रातील मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे किमान १३० गावे बाधित झाली असून २०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

राज्याच्या अनेक शहरांना मुसळधार पावसाचा फटका असला आहे. पूर्व महाराष्ट्रामधील गडचिरोलीतील १२८ गावांचा संपर्क तुटल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकणातील सर्व जिह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे. कोकणात २०० मिमीपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रत्नागिरी जिह्यातील जगबुडी व कोदवली नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.

मुंबईत कांजुरमार्ग, घाटकोपर तसेच रायगड व महाडमध्ये एनडीआरएफच्या प्रत्येकी एक अशा चार तुकड्या तैनात केल्या आहेत. जून ते जुलै महिन्यात नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत राज्यात ६७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात येणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; दोघांचा मृत्यू

First Published on: July 10, 2022 1:00 PM
Exit mobile version