संभाजीराजेंबाबत उद्धव ठाकरे जो काही निर्णय देतील तो आम्हाला मान्य, उदय सामंतांची भूमिका

संभाजीराजेंबाबत उद्धव ठाकरे जो काही निर्णय देतील तो आम्हाला मान्य, उदय सामंतांची भूमिका

मुंबईः संभाजीराजेंसंदर्भात उद्धव ठाकरे साहेब जो काही निर्णय देतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल आणि महाविकास आघाडीला देखील मान्य असेल, असे दस्तुरखुद्द स्वतः शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे, असं तंत्र आणि उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणालेत. उदय सामंत यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

छत्रपती संभाजीराजेंच्या बाबतीतला जो काही निर्णय होता, तो परवा ज्या ठिकाणी राहायला होते, त्या ठिकाणी सचिव अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांचा संदेश म्हणून त्यांच्याकडे दिलेला आहे. त्याच्यानंतर काय घडामोडी मुंबईत झाल्यात, ते मला माहीत नाही. कालपासून मी मुंबई नाही आहे. आजदेखील नागपूरमध्ये आहे. मला वाटतं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब राज्यसभेच्या संदर्भातला जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला सगळ्यांना बंधनकारक राहील. कारण शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंच्या आदेशावर चालतो, असंही उदय सामंत यांनी सांगितलंय.

विशेष म्हणजे निधी वाटपात शिवसेनेच्या आमदारांची नाराजी असल्याचं विचारलं असता ते म्हणाले, निधी वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य ती दखल घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांशी चर्चा केलेली आहे. सगळ्या आमदारांना ते भेटतायत. ज्या ज्या ठिकाणी हा अन्याय झाला असे वाटते. त्या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न करताय. परंतु या सगळ्या गोष्टींचा महाविकास आघाडीच्या सत्तेवर परिणाम होईल, असं मला वाटत नाही. पाच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार आहे, तसं व्यवस्थितरीत्या चालेल. ज्या ज्या ठिकाणी हा निधी कमी पडलेला आहे. त्या त्या ठिकाणी सीनियर मंत्री त्याला कशा पद्धतीनं न्याय द्यायचा आहे हे देखील बघतायत. मागच्या अधिवेशनातही शिवसेनेच्या आमदारांना प्रत्येकी 25 ते 30 कोटी रुपये मतदारसंघात देण्याचा निर्णय हा उद्धव साहेब, अजितदादा आणि बाळासाहेब थोरातांनी घेतलेला आहे. ते पैसे माझ्यासकट सगळ्यांच्या मतदारसंघात पोहोचलेले आहेत, असंही ते म्हणालेत.


हेही वाचाः मुश्रीफांच्या बेनामी संपत्तीवर लवकरच कारवाई तर अनिल परबांचे काऊंटडाऊन सुरु, सोमय्यांचा इशारा

First Published on: May 24, 2022 11:06 AM
Exit mobile version