… तुम्ही असेच मरणार, सध्याच्या राजकीय स्थितीवर इंदुरीकर महाराजांची तुफान फटकेबाजी

… तुम्ही असेच मरणार, सध्याच्या राजकीय स्थितीवर इंदुरीकर महाराजांची तुफान फटकेबाजी

किर्तनकार इंदुरीकर महाराज

राज्यातील सत्तानाट्यावर सोशल मीडियावर मीम्सचा तुफान पाऊस पडतोय. त्यातच, प्रसिद्ध किर्तनकार इंदूरीकर महाराज यांनीही सध्याच्या परिस्थितीवर किर्तनातून वाभाडे काढले आहेत. टीव्हीचं बटन दाबलं की ब्रेकिंग न्यूज, बैठक सुरू, खलबतं सुरू, तुम्ही सगळे असेच मरणार, असं म्हणत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. आज चाळीसगावमध्ये इंदुरीकर महाराजांचं किर्तन झालं, त्यावेळी त्यांनी राजकारणावर टीका केली. (… You will die like this, Indurikar Maharaj’s kirtan on the current political situation)

हेही वाचा – संकटाच्या काळात कोणीही विचारपूस केली नाही, यामिनी जाधवांचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

इंदुरीकर महाराज म्हणाले की, तीन दिवस झाले राज्यात कुणालाच काही सुधरत नाही. टीव्हीचं बटन दाबलं की ऐकू येते ब्रेकिंग न्यूज, आणि बैठक सुरू.. खलबतं सुरु.. तुम्ही सगळे असेच मरणार.. असा त्यांच्या खास शैलीत इंदुरीकरांनी नेत्यांचे वाभाडे काढले.

आणखी वाचा 

खुर्चीच्या लोभासाठी विरोधक एकत्र आले, त्यांनी तुम्हाला विचारलं का, आम्ही एकत्र येतोय असं? असं विचारत त्यांनी जनतेला सवाल केला. तुम्ही त्यांचे बोर्ड लावा, सतरंज्या झटका आणि मरा, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांनाही टोला लगावला आहे.

जे आमदार आहेत त्यांना मतदान कसं करायचं ते शिकवावं लागतं. त्यासाठी तीन तीन वेळा बैठक घ्यावी लागते. ‘झाकली मूठ सव्वा लाखाची आंधळे दळत आणि कुत्रं पीठ खातं’ असा टोला कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी सर्वच आमदारांना लगावला.

First Published on: June 24, 2022 7:22 PM
Exit mobile version