घरमनोरंजनप्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यला जामीन मंजूर ; लैंगिक शोषण केल्याचा झाला होता...

प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यला जामीन मंजूर ; लैंगिक शोषण केल्याचा झाला होता आरोप

Subscribe

२०२० च्या फेब्रुवारीमध्ये गणेशची सहकारी कोरिओग्राफर्सनं त्याच्यावर लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप केला होता. या आरोपामुळे गणेश आचार्यची बॉलिवूडमध्ये खूप नाच्चकी झाली होती

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि डान्सर गणेश आचार्यवर गेल्या काही दिवसांपूर्वी एका तरूणीने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. मागील दोन वर्षांपूर्वी त्याने त्या तरूणाला मारहाण आणि लैंगिक शोषण केसल्याचा आरोप गणेश आचार्यवर करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फेब्रुवारी २०२० मध्ये अंबोली पोलिसांनी गणेश आचार्यवर हा गुन्हा दाखल केला होता. मात्र आता गणेशला या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे.

२०२० च्या फेब्रुवारीमध्ये गणेशची सहकारी कोरिओग्राफर्सनं त्याच्यावर लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप केला होता. या आरोपामुळे गणेश आचार्यची बॉलिवूडमध्ये खूप नाच्चकी झाली होती. गणेश आचार्य गेल्या अनेक काळापासून सिनेसृष्टीशी जोडला गेला आहे. अनेक मोठमोठ्या चित्रपटांची कोरिग्राफी केलेली आहे. मागील वर्षी रिलीज झालेल्या पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि समंथा प्रभूच्या ‘उ अंटावा’ गाण्याची कोरिग्राफी केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Jethwani (@juniorjethu)

- Advertisement -

 गणेशवर लैंगिक छळाचा आरोप करत महिलेने सांगितले होते की, जेव्हा गणेश आचार्य ऑफिसमध्ये काम करण्यासाठी आली होती. त्यावेळी आचार्यने तिच्या वाईट कमेंट केल्या तसेच तिला अश्लील व्हिडीओ पाहण्यासाठी परावृत्त केलं. इतकंच नव्हे तर या महिले शिवाय आचार्यने इतर महिलांवर देखील असे लैंगिक अत्याचार केले आहेत, मात्र त्या बदनामीला घाबरत असल्याने त्या तक्रार करत नाहीत.

मात्र आचार्यने आपल्यावर लागलेल्या सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले, शिवाय हा आपल्याला फसवण्याचा डाव आहे असे सांगितले.

- Advertisement -

 


हेही वाचा :  हेमांगी विचारतेय ‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?’ नेटकऱ्यांकडून मिळालं सनसनीत उत्तर

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -