Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthरात्री उशिरापर्यंत मोबाईल वर chat करता ? सावधान

रात्री उशिरापर्यंत मोबाईल वर chat करता ? सावधान

Subscribe

मोबाईल मध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या मेसेजिंग ॲप मुळे आपण हल्ली चॅटिंगच्या माध्यमातून एकमेकांशी गप्पा मारतो. तसं पाहता दिवसभर आपल्या कामात व्यस्त असणारे अनेक जण रात्री झोपण्यापूर्वी चॅटिंग करायला सुरुवात करतात. रात्री अनेकदा उशीर झाल्याने आपल्या मित्र परिवारास फोनवर बोलणं शक्य होत नाही. तेव्हा बऱ्याचदा आपण चॅट करण्यास पसंती दर्शवतो. सोशल मीडियावर तर रात्री दहा ते बारा या वेळेत सर्वात जास्त लोक ऑनलाईन असतात आणि यातून एकमेकांशी संवाद साधतात. पण रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या चॅटिंग मुळे तुमच्या आयुष्यावर सहजपणे परिणाम होतात.

हेही वाचा हवामान आणि झोपेचं आहे थेट connection

- Advertisement -

रात्री उशिरा केलेल्या चॅटिंग मुळे नक्की काय परिणाम होतात ?

एका संशोधनानुसार असे म्हटले जाते की रात्री सुरू असलेल्या चॅटिंग मुळे तुम्हाला एखाद्याच्या मनाचा अचूकअंदाज लावता येतो. रात्रीच्या वेळी आजूबाजूला शांतता असते. त्यामुळे दिवसभरातून आलेला थकवा किंवा उदासीनता मुले मुली सहजरित्या चॅटिंग मधून बोलून दाखवतात. एरवी दिवसाढवळ्या दिलखुलास बोलणारी माणसं सुद्धा आपलं दुःख, मनातील इच्छा रात्रीच्या चॅटिंग द्वारे सहज बोलून जातात. त्यामुळे रात्रीचा संवाद हा अधिक भावनिक होत जातो. अशावेळी समोरची व्यक्ती जर समाज माध्यमांवरील ॲपवरून बोलत असेल तर तुमच्या भावनांचा गैरफायदा सुद्धा घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर शारीरिक त्रास सुद्धा सुरू होतात. रात्री वेळेवर झोप न लागणे,दुसऱ्या दिवशी सकाळी उत्साह नसणे, कोणतही काम करताना सुरुवातीला खूप उत्साह असला तरी काही काळानंतर कंटाळा येणे. त्याचबरोबर चेहऱ्यावर डोळ्याखाली काळे डाग पडणे,सतत थकवा येणे यासारख्या शारीरिक अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागते.

- Advertisement -

मोबाईल वर रात्री संवाद साधत असताना आपल्या शरीरातील हार्मोन्समध्ये सुद्धा बदल होतो आणि त्यामुळे आपल्या दिनचर्येत फरक पडायला सुरुवात होते. मोबाईलच्या येणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांची दृष्टी सुद्धा कमी व्हायला लागते. रात्रीचे चॅट करणे हे शरीर आणि मन दोन्हीला हानिकारक ठरू शकते. याचे परिणाम हे लवकर दिसले नाहीत तरी दूरगामी राहू शकतात असा अंदाज लावण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्ही रात्रीचे चॅट अतिरिक्त प्रमाणात करत असाल तर त्यावर वेळीच आवर घालणे आवश्यक आहे .

- Advertisment -

Manini