Thursday, May 9, 2024
घरमानिनीBeautyआठवड्यातून किती वेळा शॅम्पू करावा?

आठवड्यातून किती वेळा शॅम्पू करावा?

Subscribe

हिवाळा येतो ते अनेक समस्या घेऊनच. या ऋतूत प्रामुख्याने केसात कोंडा होण्याची आणि केस गळण्याची समस्या जाणवते. याशिवाय दर काही दिवसांनी केस घाण आणि तेलकट सुद्धा होतात. ज्यांचे केस हे आधीच कोरडे आहेत त्याचे तर ते आणखीनच कोरडे जाणवू लागतात. अशा परिस्थितीत केसांची काळजी कशी घ्यावी? कोणते तेल वापरायचे असे अनेक प्रश्न महिलांना सतावतात. तुम्हालाही अशा समस्या हिवाळयात जाणवत असतील तर ही बातमी पूर्ण वाचा.

हिवाळ्यात किती वेळा केस धुवावेत?

- Advertisement -

How Often Should You Wash Your Hair? Derms Weigh Inहिवाळ्यात केस दर २ ते ३ दिवसांनी धुवावेत. अशाने कोंड्याची समस्या जाणवणार नाही. थंडीच्या दिवसात केस हे नेहमी सामान्य तापमानाच्या पाण्याने धुवावेत. हिवाळ्यात केस कधीही थंड किंवा गरम पाण्याने धुवू नयेत. त्याने तुमच्या समस्या अधिकच वाढतील.

केस निरोगी आणि घनदाट राहण्यासाठी कोणते उपाय कराल?

- Advertisement -

हलक्या तेलाने मालिश करा
हिवाळ्यात केसांना मालिश करण्यासाठी बदामाच्या तेलाचा वापर करावा. कारण या तेलाचे कण हे लहान आणि हलके असतात जे केसांमध्ये सहज शोषले जातात. तर खोबरेल तेलाचे कण हे जाडसर असतात जे केसांमध्ये शोषले जात नाही. परिणामी ते जमा होतात आणि केसांच्या समस्या अधिकच जाणवू लागतात.

लिंबू लावण्याने होईल फायदा
थंडीच्या दिवसात कोंड्याची समस्या अधिक प्रमाणात जाणवते. अशा वेळी केसांना लिंबाचा रस लावल्यास कोंडा आणि खाज कमी होण्यास मदत मिळते. तसेच केसांना कधी-कधी कंडिशनिंग जरूर करावे ते फायद्याचे असते. म्हणजेच, हिवाळ्यात केसांशी संबधित गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून केस निरोगी राहतील.

हर्बल शॅम्पूचा वापर करा
केमिकलयुक्त शॅम्पू वापरण्याऐवजी हर्बल शॅम्पू वापरा. केमिकलयुक्त शॅम्पूने केसांच्या समस्या आणखीनच वाढतात.

संतुलित आहार घ्या
केस निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार करणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ खायला हवेत.

स्कार्फ़ वापरा
केसांना निर्जीव बनविण्यात प्रदूषण, धुळीचे कण यांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे कुठेही प्रवासाला निघताना केसांना स्कार्फ़ने झाकून ठेवा.

 


हेही वाचा ; विंटर केअरसाठी हटके टिप्स

 

- Advertisment -

Manini