घरअर्थजगतअवघ्या 15 रुपयांकरिता Reliance ला तब्बल 15 हजार रुपयांचा फटका

अवघ्या 15 रुपयांकरिता Reliance ला तब्बल 15 हजार रुपयांचा फटका

Subscribe

नवी दिल्ली : मॉल अथवा सुपरमार्केटमध्ये विविध वस्तूंच्या खरेदीवर सवलत दिली जाते. त्यामुळे ग्राहक त्याकडे आकर्षित होऊन, तातडीने गरज नसतानाही त्या वस्तूंची खरेदी करतो. मात्र जयपूरमधील एका प्रकरणात रिलायन्स रिटेल लिमिटेडला अवघ्या 15 रुपयांकरिता 15 हजार रुपयांचा फटका बसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – Income Tax : राजन विचारेंनी प्राप्तिकर विभागाची कारवाई झाल्याचे वृत्त फेटाळले

- Advertisement -

रिलायन्स रिटेलच्या फ्रँचायझी अंतर्गत रेंजर फर्म्स लिमिटेडच्या (डीलर) स्टोअरमधून पंकज मांडा यांनी 2019.77 रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या. त्यात 20 ग्रॅमसाठी ‘गोदरेज एक्स्पर्ट क्रीम हेअर कलर डार्क ब्राऊनट समाविष्ट होते, ज्याची एमआरपी 33.25 रुपये होती आणि त्यावर 2 रुपयांची सूट होती. सवलत दिल्यानंतर, ही किंमत 31.25 रुपये असायला हवी होती. परंतु, डीलरने सवलत न देता त्यांच्याकडून सर्व किंमत वसूल केली. याशिवाय, 92 रुपये दराचे ‘चारमिनार ब्राऊन वन किलो’ खरेदी केले. त्यावर 13 रुपयांची सवलत लागू केल्यानंतर, अंतिम किंमत 79 रुपये असायला हवी होती. परंतु, सवलत न देता व्यापाऱ्याने मांडा यांच्याकडून पूर्ण रक्कम घेतली. अशा प्रकारे, डीलरने सवलत असतानाही 15 रुपये अतिरिक्त आकारले.

हेही वाचा – Internal Disputes In MNS : मनसेचा अंतर्गंत वाद चव्हाट्यावर; नवी मुंबईत दोन गटांत राडा

- Advertisement -

याबाबत, पंकज मांडा यांनी डीलर आणि रिलायन्सशी अनेकवेळा संवाद साधला, परंतु त्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. नाराज होऊन मांडा यांनी अखेर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग – II, जयपूर यांच्याकडे तक्रार नोंदवली. डीलर आणि विक्रेते जिल्हा आयोगासमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे अलीकडेच त्यांच्यावर एकतर्फी कारवाई करण्यात आली.

जिल्हा आयोगाने डीलर आणि विक्रेत्याला जादा आकारण्यात आलेले 15 रुपये परत देण्याचे निर्देश दिले. तसेच मानसिक त्रासापोटी तक्रारदाराला 10 हजार रुपये आणि खटल्याच्या खर्चापोटी 5 हजार रुपये देण्याचेही निर्देश आयोगाने दिले. विक्रेता आणि डीलरने तक्रारदाराकडून वस्तूवर सवलत असतानाही अवाजवी शुल्क आकारले, असे सांगत जिल्हा आयोगाने सेवेतील कमतरता आणि अनुचित व्यापार पद्धतींसाठी विक्रेता आणि डीलर यांना जबाबदार धरले.

हेही वाचा – Mallikarjun Kharge: काहीही झालं तरी मोदींना वाटतं की, माझ्यावर टीका…; खर्गेंनी मालदीव वादावरून साधला निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -