Thursday, May 9, 2024
घरमानिनीBeautyकेसांच्या वाढीसाठी गुलाबाच्या पाकळ्याही आहेत उपयुक्त

केसांच्या वाढीसाठी गुलाबाच्या पाकळ्याही आहेत उपयुक्त

Subscribe

गुलाब हे फूल आंतरराष्ट्रीय फूल म्हणून ओळखते जाते. गुलाब हे फूल प्रेम, पवित्रता, विश्वास आणि सौंदर्य यांचे प्रतीक आहे. भारतासह अनेक आशियाई देशांमध्ये शतकानुशतके गुलाबपाणी सौंदर्य पथ्येचा एक भाग आहे. गुलाबाची फुले, फुलांपासून तयार केलेले गुलाबजल, गुलाबाचे आवश्यक तेल यांचाही वापर करण्यात आला आहे. सुगंधी असल्याने त्याचा वापर आणखी वाढतो. त्याच्या औषधी क्षमतेमुळे, हे प्राचीन औषध आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. केसांच्या वाढीसाठी गुलाबाच्या पाकळ्या कशा वापरायच्या हे आपण जाणून घेऊया.

केसांच्या वाढीसाठी गुलाबपाणी फायदेशीर

  • गुलाबामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म तसेच दाहक-विरोधी क्षमता असते.
  • गुलाबपाणी केसात होणारी जळजळ कमी करू शकतात.
  • डोक्यातील कोंडा आणि असंतुलनामुळे उद्भवणाऱ्या केसांच्या इतर समस्या दूर करून गुलाबाचे पाणी  केस मजबूत करू शकतात.
  • गुलाबामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 3, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असते.
  • गुलाबजल केसातील कोरडेपणा दूर करते.

Rose water for great hair for your wedding | Femina.in

- Advertisement -

असा बनवा केसांसाठी गुलाब पाण्याचा हेअर मास्क

  • सर्वप्रथम 2-3 गुलाबाच्या पाकळ्या घ्या.
  • यात 2 कप पाणी घालून मंद आचेवर त्या उकळवून घ्या.
  • यानंतर हे पाणी चांगले फिल्टर करा.
  • अशा प्रकारे याचे गुलाबजल तयार होईल.
  • अशातच आता शॅम्पूने केस धुतल्यानंतर या पाण्याने टाळू आणि केसांना मसाज करा.
  • हे पाणी केसांना पोषण देतात.

Unusual ways to use rose water in your beauty routine | Be Beautiful India

  • या सुगंधी पाण्याने केसही मऊ होतील.
  • अशातच तुमच्या शाम्पू कंडिशनरमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेले गुलाबाचे पाणी मिसळा.
  • याचा नियमित वापर करूनही तुमच्या केसातील कोंडा संपतो.
  • याशिवाय गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेले गुलाबजल मिस्टिंग बॉटलमध्ये ठेवा.
  • अशातच आठवड्यातून 2 ते 3 वेळा गुलाबांच्या पाकळ्यांनी केस धुवा.
  • यामुळे केसांच्या मुळांना हानी पोहचत नाही. तसेच जास्त प्रमाणात केस गळत असतील तर ते देखील यामुळे कमी होईल.

हेही वाचा : 

लांब केसांसाठी ‘अशा’ प्रकारे वापरा भृंगराज पावडर

- Advertisment -

Manini