Tuesday, April 30, 2024
घरमानिनीBeautySummer Hair Care : उन्हाळ्यात अशी घ्या केसांची काळजी

Summer Hair Care : उन्हाळ्यात अशी घ्या केसांची काळजी

Subscribe

महिला सुंदर दिसण्यासाठी नेहमीच त्यांच्या केसांची काळजी घेत असतात. कारण त्यांच्या सुंदर दिसण्यात केसांचा वाटा फार मोठा असतो. दाट, चमकदार आणि मजबूत केस कोणाला आवडत नाहीत, पण या उन्हाळ्यामध्ये त्वचेबरोबरच केसांवरही वाईट परिणाम होऊ शकतो. कडक उन्हामुळे केस निर्जीव होतात. अशा वेळी अतिरिक्त काळजी घेण्याची गरज आहे. सूर्यप्रकाश, प्रदूषण, घाण, खाण्याच्या चुकीच्या सवयी यामुळेही केस निर्जीव होतात. या कडक उन्हात तुम्ही तुमचे केस कसे निरोगी ठेवू शकता, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

केसांचा ऊन्हापासून बचाव करा
सूर्याच्या अतिनील किरणांमुळे तुमच्या केसांना इजा होऊ शकते, ज्यामुळे कोरडेपणा, स्प्लिट एन्ड्स आणि रंग खराब होतो. थेट सूर्यप्रकाशापासून केसांचे संरक्षण करण्यासाठी टोपी घाला किंवा स्कार्फ वापरा.

- Advertisement -

केसांना स्वच्छ ठेवा
उन्हाळ्यात धुळ, प्रदुषण आणि वाढत्या उष्णतेमुळं केसांमध्ये घाण आणि घाम जमा होत असतो. त्यासाठी नियमितपणे केसांना साफ करायला हवं. केसांसाठी चांगल्या प्रतीचा शॅम्पू वापरायला हवा. त्याचबरोबर धुतलेल्या केसांना हायड्रे़ट ठेवण्यासाठी तेल लावायला हवं. हे तेल केस धुण्याच्या 1 तास आधी किंवा रात्री झोपताना तेल लावलं तर त्याचा अधिक फायदा होत असतो.

केस धुण्यापूर्वी तेल लावा
निर्जीव केस धुण्यापूर्वी नारळ किंवा कोणत्याही तेलाने शॅम्पू नक्की करा. तेलाने मसाज केल्यानंतर कमीत कमी तासाभरानंतरच केस धुवावेत. जर तुमचे केस खूप कोरडे असतील तर एक दिवस आधी रात्री तेलाचा मसाज करा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू करा. यामुळे तुमच्या केसांना चांगला ओलावा मिळेल.

- Advertisement -

केसांना ट्रिम करत रहा
केस निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे ट्रिम करणे आवश्यक आहे. यामुळे केसांची समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे महिन्यातून एकदा केसांची ट्रिमिंग करून घ्या.

सोप्या घरगुती टीप्स

  • अंड्याचा पांढरा भाग केसांना लावावा. यामुळे केस मुलायम होतात.
  • बेसन, लिंबाचा रस आणि दही समप्रमाणात घेऊन केसांना लावल्यास केसांना चांगली चकाकी येते.
  • कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्यास केसांचा कोरडेपणी कमी होण्यास मदत होते.
  • उन्हाळ्यात कोमट पाण्याने धुवावे. गरम पाण्यामुळे केसांची मुळं हलकी होतात.
  • मेहंदी थंड असल्यामुळे उन्हाळ्यात 15 दिवसांनी केसांना मेहंदी लावावी.
  • केसांना एलोवेरो जेल लावा. साधारण 30 मिनिटांपुर्वी केस धुवायाच्या आधी हे जेल लावा.
  • तुम्ही आवळ्याचा ज्यूसही लावू शकता. हाही साधारण 20-30 मिनिटे आधी लावा.
- Advertisment -

Manini