Saturday, April 27, 2024
घरमानिनीBeautyHair Care Tips : केसांना मेहंदी लावण्याचे फायदे की तोटे

Hair Care Tips : केसांना मेहंदी लावण्याचे फायदे की तोटे

Subscribe

केस मजबूत करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत लोक अनेक घरगुती उपाय देखील करून बघतात. असे बरेच लोक आहेत जे केसांना मेंदी लावतात, ज्यामुळे केस मजबूत राहतात. पण केसांना मेंदी लावणे योग्य आहे का? जाणून घेऊयात.

मेहंदी लावण्याचे फायदे :

मेहंदी केसांना सुंदर तर बनवतेच पण ते मजबूतही करते. हे केसांना लावल्याने केस चमकदार होतात. एवढेच नाही तर केस गळण्याची समस्या असल्यास तुम्ही मेंदी वापरू शकता. केसांना मेंदी लावणे कोंड्याच्या त्रासाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. मेहंदी हा केसांसाठी नैसर्गिक आणि सुरक्षित रंग आहे, जो इतर केमिकल्सपेक्षा जास्त फायदेशीर आहे.

- Advertisement -

मेहंदीमध्ये या गोष्टीचा वापर करू नका :

मेहंदी लावण्यापूर्वी केसांना तेल लावू नका

डोक्याला मेहंदी लावणार असाल तर तेल वापरू नका. जर तुम्हाला आवश्यक असेल तर केसांच्या मुळांना फक्त ते लावा तेही एक दिवस अगोदर. जर तुमचे केस ड्राय नसतील तर मेंदी लावण्याआधी तेल वापरू नका. तेल लावल्यामुळे केसांच्या वर एक तेलाचा थर बनतो त्यामुळे मेहंदीचा रंग त्यावर चढत नाही. तुम्हाला वाटत असेल की मेहंदी मुळे केसांना रंग चांगला यावा तर तेल लावू नका.

साध्या पाण्यामध्ये मेहंदी भिजवू नका

केसांना मेहंदीचा चांगला रंग यावा असे वाटत असेल तर साध्या पाण्यात ते कधीही भिजवू नका. तुम्हाला वाटले तर ते कॉफी अथवा चहा पत्ती च्या पाण्यात मिक्स करून त्यामध्ये भिजवू शकता. यामुळे केसांचा रंग चांगला गडद होतो. तुम्ही हे पाणी गार करू मग त्यानंतर मेहंदी साठी वापरू शकता.

- Advertisement -

काळजी घ्या

मेहंदी केसांना केवळ सुंदरच बनवत नाही तर ते मजबूत, घट्ट आणि चमकदार बनवते. पण काही लोकांना मेंदी वापरण्याची ॲलर्जी असू शकते, त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा मेंदी लावत असाल तर आधी काही टेस्ट करून घ्या. मेंदीचा जास्त वापर केल्याने केसांचा रंग लवकर बदलतो आणि हळूहळू केसांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. केसांवर फक्त चांगल्या दर्जाची मेंदी लावण्याचा प्रयत्न करा. काही लोकांच्या केसांवर मेंदीचा चांगला परिणाम होतो, तर काही लोकांच्या केसांवर ऍलर्जीची तक्रार असते. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदाच मेहंदी लावत असाल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

कुणी मेहंदीचा वापर करणं टाळावं :

  • सतत डोकेदुखीनं त्रस्त असणाऱ्यांनी मेहंदी लावू नये.
  •  सर्दी, पडसं, ताप या समस्या असणाऱ्यांनी मेहंदी लावू नये.
  •  लहान मुलांनी याचा वापर करू नये.
  •  मेहंदी महिन्यातून एक किंवा दोन वेळाच लावावी.
- Advertisment -

Manini